Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть संपूर्ण अथर्वशीर्ष । 4K | स्पष्ट उच्चार सहित | Sampoorn Atharwashirsh

  • Inner Wisdom
  • 2025-08-27
  • 7
संपूर्ण अथर्वशीर्ष । 4K | स्पष्ट उच्चार सहित | Sampoorn Atharwashirsh
#motivational #trending #mostwatchedvideo #bestvideo #
  • ok logo

Скачать संपूर्ण अथर्वशीर्ष । 4K | स्पष्ट उच्चार सहित | Sampoorn Atharwashirsh бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно संपूर्ण अथर्वशीर्ष । 4K | स्पष्ट उच्चार सहित | Sampoorn Atharwashirsh или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку संपूर्ण अथर्वशीर्ष । 4K | स्पष्ट उच्चार सहित | Sampoorn Atharwashirsh бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео संपूर्ण अथर्वशीर्ष । 4K | स्पष्ट उच्चार सहित | Sampoorn Atharwashirsh

स्वर: ईक्ष्वाकू देवपाठक

‘गण‘ म्हणजे अष्टवसूंचा समूह. ‘वसु’ म्हणजे दिशा, दिकपाल, दिक् देव म्हणून दिशांचा स्वामी आणि ‘पती’ तो गणपती. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीपूजन करतात. गणपतीने एकदा दिशा मोकळया केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तिथे येऊ शकते. यालाच ‘महाद्वारपूजन’ किंवा ‘महागणपतीपूजन’ असे म्हणतात.याशिवाय ‘गण ‘ म्हणजे पवित्रके,जी अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म असतात म्हणून गणपती म्हणजे पवित्रकांचा स्वामी.

जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाया ‘तिर्यक’व ‘विस्फुटीत लहरींचा समूह’ म्हणजे ‘गण’,त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा तो गणपती. ह्या 360 वेगवेगळया लहरी अष्टदिशांमधून अव्याहतणे प्रवास करीत असतात. अशां या गणपतीची आराधना करतांना पूजा, उपवास व अर्थवशीर्षाची आर्वतले करतात. त्यापैकी पूजा ही षोडशोपचार करून प्राणप्रतिष्ठा करतात. धूप, दीप, नैवेद्य, आरती करून मूर्तीत प्राण जागृत करतात.

पूजा करतांना लाल वस्त्र, तांबडे फूल व रक्तचंदन वापरतात. लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीक़डे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीला दुर्वा आवडतात. म्हणजे गणपती दुर्वांनी आच्छादल्यामुळे मूर्तीच्या बाजूने दुर्वामचा वास निघायला लागतो. हा गंध गणपतीच्या आकारात संप्रषित होतो म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकाराला या आकाराकडे येणे सोपे जाते यालाच मूर्ती जागृत झाली असे म्हणतात. याशिवाय शमीमध्ये ‘अग्नीचावास’ आहे व मंदार हे ‘एक वानस्पत्य रसायन’आहे म्हणून गणपतीला प्रिय आहे.उपास किंवा उपवास हे व्रत असून या व्रताची देवता ‘श्री सिध्दीविनायक’ आहे. सर्व चांगले व्हावे ह्याकरिता ‘विनायकी’ करतात. ‘संकष्टी’ ह्या व्रताची देवता ‘श्री विघ्नविनायक’ आहे. विघ्न म्हणजे संकट, पृथ्वीपासून येणाऱ्या 360 लहरींनी आपण वेढले जातो. त्यामुळे शरीरातील प्रवाह बंदिस्त होतात व यालाच ‘संकट’ म्हणतात. कृष्ण पक्षात 360 लहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे शरीराच्या नाडयांतील प्रवाह बंदिस्त होतात.

‘अथर्वशीर्ष‘- ‘थर्व’ म्हणजे गरम, ‘अथर्व’ म्हणजे शांती व ‘शीर्ष’ म्हणजे मस्तक. ‘ज्याच्या पुरचरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अर्थवशीर्ष होय’. यानंतर नैवेद्य, या नैवेद्यात परिपूर्ण आहारात मोदकाचा समावेश असतो. मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणून त्याला ‘ज्ञानमोदक’ असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते. (मोदकाचे टोक हे त्याचे प्रतीक आहे.) पण अभ्यास करू लागल्यावर समजते की ज्ञान हे फारच मोठे आहे. मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो. पूजा करणारा गणेश लहरींनी सपृक्त व्हावा, हा पूजेचा उद्देश असतो. ही संपृक्तता वाढविण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे ‘उत्तरपूजा’. उत्तरपूजेच्यावेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके एकदम बाहेर पडतात व पूजा करणाऱ्याला त्याचा लाभ होतो. गणपती हा बुध्दीदाता आहे म्हणून प्रथम ‘श्री गणेशायनम:’ असे लिहितात. ज्ञान ग्रहण केले तर ते शब्दबध्द करण्याचे काम सरस्वतीचे आहे. गणपती ही एकमेव देवता ‘शब्दभाषा’ म्हणजेच ‘नादभाषा’ जाणणारी देवता आहे. आपण बोलतो ती नादभाषा गणपती समजू शकतो म्हणूनच तो लवकर प्रसन्न होणारा देव आहे. इतर देव बहुतांशी प्रकाशभाषा समजू शकतात. गणपती ही नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे. ‘गणेशविद्या’ म्हणजे ध्वनीवर आधारीत लेखशास्त्र. ‘गं’ हा बीजमंत्र नीट लिहिण्याच्या संदर्भात हा शब्द या अर्थाने गणपती अर्थवशीर्ष या स्तोत्रात वापरलेला आहे. अशी ही गणपती देवता व तिचे पूजन भक्तिभावाने केल्यास तसेच दररोज गणेशाला नमन केल्यास प्रत्येकाला त्याचा जरूर अध्यात्मिक फायदा होतो.

ॐ नमस्ते गणपतये ॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ॥ त्वमेव केवलं कर्तासि ॥ त्वमेव केवलं धर्तासि ॥ त्वमेव केवलं हर्तासि ॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि ॥ त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ १ ॥
ऋतं वच्मि ॥ सत्यं वच्मि ॥ २ ॥
अव त्वं माम् ॥ अव वक्तारम् ॥ अव श्रोतारम् ॥ अव दातारम् ॥ अव धातारम् ॥ अवानूचानमव शिष्यम् ॥ अव पश्चात्तात् ॥ अव पुरस्तात् ॥ अवोत्तरात्तात् ॥ अव दक्षिणात्तात् ॥ अव चोर्ध्वात्तात् ॥ अवाधरात्तात् ॥ सर्वतो मां पाहि पाहि समंतात् ॥ ३ ॥

त्वं वाग्ड़मयस्त्वं चिन्मयः ॥ त्वं आनंदमयस्त्वं ब्रम्हमयः ॥ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसि ॥ त्वं प्रत्यक्षं ब्रम्हासि ॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ॥ ४ ॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ॥ त्वं भूमिरापो नलो निलो नभः ॥ त्वं चत्वारि वाक्पदानि ॥ ५ ॥

त्वं गुणत्रयातीतः ॥ त्वं देहत्रयातीतः ॥ त्वं कालत्रयातीतः ॥ त्वं मूलाधार: स्थितोसि नित्यम ॥ त्वं शक्ति त्रयात्मकः ॥ त्वां योगिनो ध्यायन्ती नित्यम ॥

त्वं ब्रम्हास्त्वंविष्णुस्त्वंरुद्रस्त्वंइंद्रस्त्वंअग्निस्त्वंवायुस्त्वंसूर्यस्त्वंचंद्रमास्त्वं ब्रम्हभूर्भुवस्वरोम् ॥ ६ ॥

गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनंतरम् ॥ अनुस्वारः परतरः ॥ अर्धेंदुलसितम् ॥ तारेण ऋध्दम् ॥ एतत्तव मनुस्वरुपम् ॥ गकारः पूर्वरुपम् ॥ अकारो मध्यमरुपम् ॥ अनुस्वारश्चान्त्यरुपम् ॥ बिन्दुरुत्तररुपम् ॥ नादःसंधानम् ॥ संहितासंधी: ॥ सैषा गणेश विद्या ॥ गणकऋषि: निछॄद् गायत्री छंदः ॥ गणपतीर्देवता ॥ ॐ गं गणपतये नमः ॥ ७ ॥

एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ॥ तन्नो दंति: प्रचोदयात् ॥ ८ ॥

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ॥ रदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजम् ॥ रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ॥ रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ॥ भक्तानुकंपिन देवं जगत्कारणमच्युतम् ॥

आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकॄते: पुरुषात्परम् ॥ एवं ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनां वरः ॥ ९ ॥

नमो व्रातपतये । नमो गणपतये नमः । प्रमथपतये । नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय ॥ विघ्ननाशिने शिवसुताय ॥ श्री वरदमूर्तये नमः ॥ १० ॥

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]