पक्ष्यांसोबत बोलणारा "रान माणूस"|The man who Talk to birds|Humans of Konkan EP7

Описание к видео पक्ष्यांसोबत बोलणारा "रान माणूस"|The man who Talk to birds|Humans of Konkan EP7

निसर्गात राहणारी माणसे निसर्गाची भाषा समजून घेऊन त्यातील प्रत्येक घटकाशी एक प्रकारचा संवाद साधत असतात..
पूर्वी आम्ही मृगाच्या पावसाळी संध्याकाळी " आराड गे मांडके सांज जावंदे आये माझी घराक येवांदे" अस गुणगुणत जणू बेडकाशी बोलायचो..
हॉर्नबिल घरासमोर आला की अजूनही ग्रामीण तळ कोकणात "गो वायऱ्या ईलस अस म्हणत त्याचा आवाज करणारी "अवलिया" माणसे आहेत..
निसर्ग त्याच्या संगीतातून आपल्याला संदेश देत असतो.. पक्ष्यांचे आवाज अनेक प्रकारे indicator म्हणून काम करतात..
दिवसेंदिवस निसर्ग जीवन हरवत चाललंय पण काही माणसे अजूनही ते जपण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करीत आहेत..आमच्या भाषेत " रान माणसे"
Humans of Konkan ह्या सिरीज च्या माध्यमातून अश्याच निसर्ग दुतां चा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो..
ह्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत गोव्यातील mollem national park जवळ Nature's nest नावाचे bird watchers साठीचे घरटे उभे करणाऱ्या पंकज लाड यांना 🙏❤️

Комментарии

Информация по комментариям в разработке