#जेजुरी #गणपुजा #कडेपठार
कडेपठार गणपूजा उत्सव
श्रीक्षेत्र जेजुरी येथे आषाढ शुद्ध प्रतिपदेला गणपूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावर्षी सोमवार दिनांक २२ जून २०२० रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गणपूजा उत्सवासाठी गर्दी करण्यास मज्जाव केल्याने मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. साग्रसंगीतात पारंपारीक गीताच्या सुरावटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्सवाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
गणपूजा उत्सव
श्रीभगवान शंकर महादेव जगत्कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा यादिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडा-याने पूजा केली तेव्हापासून हा शुभ दिवस 'गणपूजा' या नावाने ओळखला जातो.आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कडेपठार देवता लिंग मंदिरामध्ये रात्री नित्य नेमाची पूजा झालेनंतर मानकरी देवावर भंडार वाहतात त्यापाठोपाठ सर्व भक्तमंडळी भंडार वाहतात अशा पद्धतीने स्वयंभू लिंगावर भांडाराच्या राशी उभ्या राहतात त्यानंतर देवाची आरती होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना निघतो तो रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये चालतो.
वाघ्या मुरुळी तसेच इतर स्थानिक कलाकारांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस असल्याने प्रत्येकजण आपल्या परीने देवापुढे आपली कला सादर करतात. छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवाचे अंगावरील भंडार भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.--
बहुत काय लिहिणे, हे कार्य घडावे ही श्रींची इच्छा......
सेवेचे ठायी तत्पर...... जयमल्हार........
शुभम भवतु.....
---------
श्री. अण्णाश्री उपाध्ये गुरूजी, जेजुरी.
+91 9850150797
[email protected]
[email protected]
www.jejuri.in
जयमल्हार...
#kadepathar #ganpuja #jejurichakhandoba #priest #upadhyeguruji #malhar #martand #folksongs #waghyamuruli #chhabina #bhandar #mailar #malllanna #mhalsakant #yelkot #jaymalhar #aarti #Jejuri, #Khandoba, #Khanderaya, #Davana, #Dawana, #Puja, #Shiralsheth #Shriyal # #Kadepathar, #Malhar, #Aarti #Mhalsakant, #Martand, # Bhairav,. #Mallanna, #Mallappa, #Mailarling, #Shankar #Mahdev, #Mhalsa, #Ghode_Uddan, #Steps, #Karha, #karhepathar, #Purandar, #Valley, #Talav, #Sadanand, #Yelkot, #Mandir, #Temple, #Jejurgad, #Upadhye_Guruji, #Jejurgad, #Mangsooli, #Mangsuli, #DevarGudda, #Guddapur, #Dharwad, #komaruvelli, #bidar, #Manikprabhu, #Satare, #Korthan, #Dhamani, #Mailar, #Dawadi #Nimgaon, #NimgaonDawadi, #JayMalhar, #Delawadi, #Shegud, #Naldurga #Gurupournima, #Chaitra#जेजुरी #खंडोबा #म्हाळसकांत #मल्हार #मल्हारी #मार्तंड #जेजुरगड #खंडेराया #दवणा #पूजा #आरती #रामदास #स्वामी #श्रीयाळ #षष्ठी #शिराळशेठ #श्रीयाळश्रेष्ठ
Информация по комментариям в разработке