पोट साफ होण्याचे 11 उपाय || pot saf honyache upay in marathi

Описание к видео पोट साफ होण्याचे 11 उपाय || pot saf honyache upay in marathi

पोट साफ होण्याचे 11 उपाय || pot saf honyache upay in marathi

पोट साफ होण्याचे 11 उपाय

1. जेवणानंतर पपई खा. सकाळी पोट साफ होईल.

2. पपईप्रमाणेच सफरचंद, नाशपती, लिंबू, संत्री, पेरू, किवी, आलुबुखार (plum) या फळांचं सेवन केल्यानं पोट साफ होतं.

3. रात्री झोपताना ग्लासभर दुधात चमचाभर तूप टाकून उभे राहून प्या. सकाळी पोट भराभर साफ होईल.

4. त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात किंवा दुधात रात्री झोपताना घेतल्यास शौचाला साफ होते.

5. जेवल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. अर्ध्या तासाने प्यावे.

6. कोमट पाण्यात चिमूटभर हिंग घालून ते पाणी रात्री झोपताना प्यायल्यास पोट साफ होतं.

7. रात्री झोपताना अर्धा चमच्च (छोटा चमचा) ओवा पावडर कोमट पाण्यात टाकून घ्या.

8. इसबगोल 1 चमच्च वाटीभर कोमट दुधात रात्री झोपताना घेणे.

9. सकाळी उठल्यावर पोटभर पाणी प्या. 15-20 मिनिटांनी घशात बोटं घालून उलटी काढा. यालाच वमन असं म्हणतात. याने पोटातील घाण बाहेर पडते. लहान मुलांवर वमन क्रिया करू नका.

10. ताडासन, तिर्यक ताडासन, पश्चिमोत्तानासन, बंधासन, कटिचक्रासन, त्रिकोणासन ही आसनं केल्याने पोट साफ होते.

11. पोट साफ न झाल्याने हळूहळू पित्त, गॅसेस, ढेकर, जळजळ अशा समस्या उद्भवतात.

पोट साफ न होण्याची मुख्य कारणे –
1. चुकीची आहारपद्धती
2. पुरेसं पाणी न पिणं
3. व्यायामाचा अभाव
4. वेळेवर शौचाला न जाणं
5. चहा-कॉफीचं अति प्रमाण
6. धूम्रपान

पोट साफ न झाल्याने खालील लक्षणे दिसतात :
1. पोटात गॅस होणं
2. भूक मंदावणं
3. तोंडाचा वास येणे (मुख दुर्गंधी)
4. पोट जड झाल्यासारखं वाटणं
5. पोट फुगणे (bloating)
6. पचनक्रिया खराब होणं
7. बेचैन वाटणं
8. पोटात मुरडा येणं
9. शौचाला घट्ट होणं
10. नियमित शौचाला न होणं
11. शौचावेळी जोर लावावा लागणं
12. वारंवार शौचाला जावेसे वाटणे

आम्हाला मदत म्हणून –
1. व्हिडिओला LIKE करा.
2. Whatsapp, facebook वर शेयर करा.
3. अगदी छोटी का होईना मात्र Comment जरूर करा.
जसे की- धन्यवाद\आभारी आहे\thanks इ.
4. ….आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ONLY MARATHI चॅनलला Subscribe करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा.

ॐ नमो नारायणा

Комментарии

Информация по комментариям в разработке