ब्रेकफास्ट न्यूज : मल्लखांब दिन विशेष : माझाच्या न्यूजरुममध्ये मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकं

Описание к видео ब्रेकफास्ट न्यूज : मल्लखांब दिन विशेष : माझाच्या न्यूजरुममध्ये मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकं

मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेला मल्लखांब आज दुसरा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करत आहे. मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट्टदादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरांमध्ये पोचला आहे. या खेळाचा आणखी प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून, गेल्या वर्षीपासून १५ जूनला मल्लखांब आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येत आहे. मल्लखांबधुरीणांच्या या प्रयत्नांना यंदा एबीपी माझाचीही साथ लाभली आहे. जागतिक मल्लखांब संघटनेचे महासचिव उदय देशपांडे आणि श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या छोट्या मल्लखांबपटूंच्या साथीनं एबीपी माझाच्या न्यूजरुममध्ये मल्लखांब दिन साजरा होत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке