Santosh Deshmukh Case: Walmik Karad Surrender नंतर Dhananjay Munde सेफ झाल्याची चर्चा का होत आहे ?

Описание к видео Santosh Deshmukh Case: Walmik Karad Surrender नंतर Dhananjay Munde सेफ झाल्याची चर्चा का होत आहे ?

#BolBhidu #DhanajayMunde #WalmikKarad

मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी कारण तर लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कुठलाही संबंध आहे. मात्र, उगचीच कोणाचातरी राजीनामा मागायचा? आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलं आणि मुंडेंची बॉडिलॅंग्वेज पाहता त्यांचा राजीनामा सध्या तरी होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं..पण या सगळ्यात पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडीसुद्धा मुंडेंच्या सेफ होण्यामागे कारणीभूत असल्याचं म्हटलं जातयं…खरतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जात होता. मात्र वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असल्याने त्यांना पोलिसांचे अभय आहे, त्यामुळंच वाल्मिक कराड हे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही २२ दिवस पोलिस आणि सीआयाडीच्या हाती लागत नाहीत, असा आरोप जोर धरू लागला होता.

त्यामुळं धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असा सूरही उमटला. तसेच हत्येप्रकरणातील वाल्मिक कराडसह इतर आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची मागणी धनंजय देशमुखांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात केली. यासोबतच बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वीकारावी, अशीही मागणी महायुतीच्या नेत्यांकडून आणि विरोधकांकडून करण्यात आली. त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रीपद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. आता वाल्मिक कराड तब्बल २२ दिवसांनंतर सरेंडर झाला, त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडीसुद्धा सुनावण्यात आलीये.आज धनंजय मुंडे मंत्रीमंडळ बैठकीला सुद्धा आले, त्यामुळे धनंजय मुंडे सेफ झालेत का, हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке