Sharad Pawar आणि Chhagan Bhujbal यांच्या भेटीवरून चर्चांना उधाण, भुजबळांचा ट्रॅप की पवारांची खेळी ?

Описание к видео Sharad Pawar आणि Chhagan Bhujbal यांच्या भेटीवरून चर्चांना उधाण, भुजबळांचा ट्रॅप की पवारांची खेळी ?

#BolBhidu #SharadPawar #ChhaganBhujbal

छगन भुजबळांनी २ दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल की, राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी ओबीसी-मराठा हा वाद संपवायला पाहिजे आणि यात शरद पवारांनी पुढाकार घ्यायला हवा यासाठी मी पवारांची भेट घेतली. पण शरद पवारांच्या भेटीच्या एक दिवस आधी, भुजबळांनी बारामतीत भरलेल्या अजित पवार गटाच्या जनसन्मान मेळाव्यात, महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांच्या न जाण्याचा निर्णय हा शरद पवारांच्या सांगण्यावरून घेतला असा आरोप केला.

भुजबळ-पवार भेटीने २ मुख्य प्रश्न उपस्थित झाले.यातला पहिला प्रश्न आहे, महायुती सरकारमध्ये असताना आणि मराठा-ओबीसी वाद मागच्या एका वर्षापासून चालू असताना भुजबळांना आताच शरद पवारांची भेट का घ्यावी वाटली ? यातला दूसरा प्रश्न असा की, छगन भुजबळ मराठा-ओबीसी वादाचा बॉल शरद पवारांच्या कोर्टात टाकून सर्व जबाबदारी पवारांवर सोपवायत का ? म्हणजे एकप्रकारे भुजबळ पवारांना विधानसभेच्या निवडणुकीआधी ट्रॅप करतायत का? शरद पवार यात फसले की त्यांनी नवी खेळी खेळली ? पाहुयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке