Amha Nakale dyaan. By... Pt . Ajitkumar kadkade

Описание к видео Amha Nakale dyaan. By... Pt . Ajitkumar kadkade

"आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा..."

'तिलंग' रागावर आधारीत.

पं. जितेंद्र अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध करून आणि गाऊन अजरामर केलेला संत चोखामेळा यांचा हा अप्रतिम अभंग बुवांच्या पट्टशिष्यानेही किती दमदारपणे गायलाय बघा.

एका खुल्या मैफिलीतला हा व्हिडीयो आहे. तब्बल 16 मिनिटे गायलाय हा अभंग अजित कडकडेंनी.

गाणं चालू असतानाच तब्बल तीन वेळा टाळ्या पडल्या आहेत...

शेवटचा अंतरा "चोखा म्हणे माझा भोळा भाव देव" हा दोनदा गायलाय. एकदम खास.

दुसर्‍यांदा गाताना "माझा भोळा भाव" हे तीन शब्द आळवताना अजितजींचेही डोळे पाणावलेले स्पष्ट दिसून येतात.

तबलासाथ :- श्री. साई बैंकर..

पहा जरूर..

मैफिल जगा मंडळी.

शुभ दिन...

----- योगेश यशवंत काटदरे.

व्हिडीयो सौजन्य :- राहूल दोनाडकर.

Комментарии

Информация по комментариям в разработке