अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडल,गुरुकुंज आश्रम ,सामुदायिक ध्यान. Group Meditation of Rashtrasant

Описание к видео अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडल,गुरुकुंज आश्रम ,सामुदायिक ध्यान. Group Meditation of Rashtrasant

#Samudayikdhyan #सामुदायिकध्यान
*🙏🏻सामुदायिक ध्यान

परम पूज्य गुरुदेव आणि सामुदायिक ध्यानाला उपस्थित उपासकांनो, ध्यान हे स्वतःचे आत्मबल वाढवून त्यातून समाजाचासुद्धा विकास साधण्याचे एक फार मोठे साधन आहे. ध्यान कोणाचे करायचे ? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञानात सांगितले आहे की, ध्यान कोण्या ब्रह्म, ज्योती किंवा देवी-देवतांचे करायचे नसून आपले स्वतःचे ध्यान करायचे आहे. आपले मन, मनाची गती, मनाची स्थिरता, संवेदना इत्यादिंचे आणि आपल्या हृदयाला, मनाला, पंचमहाभूतांच्या या संपूर्ण शरीराला चालना देणाऱ्या त्या अदृश्य चैतन्यशक्तीचे ध्यान करणे आहे. याचे ज्ञान जेव्हा आपण करतो तेव्हा अनेक प्रकारचे सत्य एकामागे एक असे प्रगट होतात आणि जस जसे एक एक सत्य प्रगट होत जाते तशी तशी एक एक आसक्ती सुटत जाते, तुटत जाते, क्षणिक व नश्वर अशा सुखाचा तिटकारा वाटू लागतो आणि मनुष्य शाश्वत व अमर अशा आनंदाचा वेध घेण्याचे काम सुरू करतो. त्यातून मग त्याची विशालता वाढते, अनासक्ती वाढते, सुखी व आनंदी जीवन जगणे सुरु होते आणि समाजाला सुद्धा त्याचा अनेक प्रकारे लाभ होतो.
आज आपण बघतो की अतिशय बुद्धिमान मनुष्यसुद्धा दुःखी आहे, भिकारीही दुःखी आहे, श्रीमंत लोकसुद्धा भितिग्रस्त आहे, वैद्यराजसुद्धा बीमार आहेत, कलागुणसंपन्न लोकं सुद्धा समाधानी नाही, संतती असणारा आणि पुत्र नसणारा दोन्ही दुखी आहेत. म्हणजेच या बहिरंग कलाकौशल्यात काही संपूर्ण सुख निहीत नाही हे स्पष्ट आहे. म्हणून आपले ध्येय हे आंतरिक सुख समाधान असले पाहिजे. समाधान हे बाहेरून येत नाहीत तर ते आपल्या आतमधेच असते, त्याचे प्रकटीकरण करणे साधले पाहिजे. आणि आपण लोक त्या सुखाचा वेध बहिरंगात आत घेत असतो.
_*मनुष्याला वाटते की बाहेरच्या भौतिक सुखातच खरे सुख आहे आणि म्हणूनच तो आपल्या जीवनाची सर्व धावपळ या क्षणिक सुखासाठी करीत असतो. सकाळी ध्यान करतो तेव्हा आपल्याला आपले स्वरूप जाणून घ्यायचे असते की ही भौतिक संपत्ती, हे घर-दार, हा प्रपंच, हे विषय भोग कितीही भोगले तरी त्याची कृष्णा कधीच संपत नाही आणि तृष्णा, इच्छा, वासना यांचा जिथे अंत नाही तिथे दुःखाचा सुद्धा अंत नाही. या गोष्टीच्या पलीकडेसुद्धा सुखाचे अस्

Комментарии

Информация по комментариям в разработке