जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज I महत्वाची माहिती I Loan for Land Purchase I Land Loan I

Описание к видео जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज I महत्वाची माहिती I Loan for Land Purchase I Land Loan I

जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज I महत्वाची माहिती I Loan for Land Purchase I Land Loan I
#Loan_for_Land_Purchase
#Land_Loan
#जमीन_खरेदी_करण्यासाठी_कर्ज

जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज I जाणून घ्या आवश्यक माहिती
कोणती जमीन खरेदीस कर्ज मिळते.?
काय आहेत अटी आणि शर्ती.?
किती कर्ज मिळू शकते.?
व्याजदर काय असतो.?

भारतातील कोणताही नागरिक जमिनीसाठी कर्ज घेऊ शकतो. गृहकर्जासारख्या जमिनीच्या कर्जावर कोणत्याही प्रकारची टॅक्स लाभ मिळतनाही.
जमीन कर्ज काही विशिष्ट प्रकारच्या जमिनीसाठीच उपलब्ध आहे.
बँका सर्वसाधारणपणे विकास प्राधिकरणाने दिलेल्या जमिनीवर कर्ज देण्यास प्राधान्य देतात.
खेडेगावात किंवा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जमिनीवर जमीन कर्ज सामान्यतः नसते.
जमीन महानगरपालिका किंवा महापालिका हद्दीत असावी आणि जमिनीचे स्पष्ट सीमांकन देखील असावे

शेतजमीन किंवा व्यावसायिक जमीन खरेदीसाठी जमीन कर्ज उपलब्ध नाही.शेतजमीन खरेदी करण्यासाठी काही विशेष कर्जे वापरली जाऊ शकतात परंतु ही कर्जे सहजासहजी मिळत नाहीत.ही कर्जे केवळ अल्पभूधारक शेतकरी किंवा भूमिहीन मजुरांसाठी आहेत.
जमिनीचे कर्ज घेताना, जमिनीचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात आहे, हे खूप महत्त्वाचे आहे.

गृहकर्जावर, तुम्हाला मालमत्तेच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. परंतु जमीन कर्जासाठी कर्जाची रक्कम कमी आहे. जिथे फक्त जमीन खरेदीसाठी कर्ज घ्यायचे असेल, तर मालमत्तेच्या किमतीच्या 70-75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते.
जमीन खरेदीसाठी तसेच बांधकामासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर अधिक कर्ज मिळते.

गृहकर्जाचा व्याजदर खूपच कमी आहेत. तर, जमिनीची कर्जे जास्त व्याजदराने उपलब्ध आहेत.गृहकर्जाच्या बाबतीत, कर्जाची परतफेड करण्याची मुदत 30 वर्षांपर्यंत जाऊ शकते.
जमीन कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेला कमाल कालावधी 15 वर्षे आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке