prataprao gujar nesari | सरसेनापती / vedat marathe veer daudale saat | ghatibheti

Описание к видео prataprao gujar nesari | सरसेनापती / vedat marathe veer daudale saat | ghatibheti

@Vedaat Marathe Veer Daudale Saat @nesari



महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्याची मौल्यवान देणगी लाभली आहे. डोंगर माथ्यांनी नटलेल्या भूमीत अनेक संत, महात्मे, शूर-वीर होवून गेले. महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले.
कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणजे गडहिंग्लज उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्राचे शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आपल्या आत्म बलिदानाने इतिहास अजरामर केला आहे. त्यांच्या शौर्याची आठवण करून देणारी नेसरी पावनखिंड.
प्रतापरावांच्या पराक्रमाची गाथा.......
प्रतापरावाचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील ताम्हाणे तर्फ गोरेगाव होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी असे होते. शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्‌दीच्या जोरावर स्वराज्याचे सरनोबत झाले. कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना " प्रतापराव " किताब देवून गौरवण्यात आले होते. रणझुंजार प्रतापरावाने वादळ वेगाने झंझावत कार्य करून गनिमांना जेरीस आणले होते.

त्या सात योद्धांची नावे….
१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर

समाधी स्थळी कसे जाल...
1. कोल्हापूर- गडहिंग्लज- नेसरी-प्रतापराव गुजर स्मारक
2. सावंतवाडी- आजरा- नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक
3. गोवा पणजी-दोडामार्ग-तिलारी नगर - चंदगड नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक
4. बेळगाव- कोवाड - नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक
5. हुक्‍केरी - संकेश्‍वर - यमकनमर्डी- दडडी- नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक

समाधी स्थळी काय पहाल.....
- समाधी स्थळाच्या मुख्य जागेवर भव्य व आकर्षक समाधी मंदिर.
- जवळच पूर्वाभिमूख शिवमंदिर, समोर क्रांती स्तंभ.
- बाजूला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा.
- जवळच यात्री निवास.
- समोर आकर्षक तटबंदी व पूर्वाभिमुख प्रवेशद्वार
- पुरातण इतिहासाची साक्ष देणारा ओढा आहे.
- डोंगर-कपारीत उटलेले घोडयांच्या टापांचे ठसे.
- नेसरी बसस्थानक परिसरात लक्षवेधी प्रतापरावांचा अश्‍वारूढ पुतळा.

#PratapraoGujar #Sarnobat #sarsenapati #KolhapurWar #Sevenworriers #ChatrapatiShivajiMaharaj #Shivray #Rajyabhishek #bahlolkhan #Adilshahi #sardar #war#ghatibheti

#gadhinglaj
#harali
#mahagaon
#lakudwadi
#batkanangle
#nesari

Комментарии

Информация по комментариям в разработке