Rain Water Harvesting, जि.प.केंद्रशाळा, पडवळपाडा, ता.शहापूर, जि.ठाणे

Описание к видео Rain Water Harvesting, जि.प.केंद्रशाळा, पडवळपाडा, ता.शहापूर, जि.ठाणे

जि.प.केंद्रशाळा, पडवळपाडा येथे वसुंधरा संजीवनी मंडळ,ठाणे व महिंद्रा फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षी (जानेवारी २०२३) मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प करण्यात आला आहे.
मागील वर्षी येथील शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी शाळेत असलेल्या बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प व्हावा याकरिता संस्थेस मागणीपत्र दिले होते. त्यानुसार मार्च-फेब्रुवारी महिन्यानंतर येथील बोअरवेलचे पाणी कमी होऊन पाणीटंचाईमुळे विद्यार्थी व शाळेची होणारी गैरसोय लक्षात घेता,महिंद्रा फायनान्स यांच्या आर्थिक सहाय्याने व वसुंधरा संजीवनी मंडळ,ठाणे संस्थेच्या संकल्पना व नियोजनानुसार हा प्रकल्प येथे करण्यात आला.
ग्रीनआर्च असोसिएट व प्राईम सोर्स असोसिएट यांनी योग्य प्रकारे नियोजन करून वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला आहे. पावसाच्या पाण्याची योग्य साठवण करून त्याचा दुय्यम गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे व अतिरीक्त पावसाचे पाणी भूगर्भात पुनर्भरण करून भूगर्भातील पाण्याचे साठे शाश्वत ठेवणे यासाठी तयार केलेली प्रभावशाली जलव्यवस्थापन प्रणाली म्हणजेच पर्जन्य जलसंचयन प्रकल्प (RAIN WATER HARVESTING) होय. या प्रकाल्पाची एकूण पुनर्भरण क्षमता 461 cu.m म्हणजेच 461250 Lit/Year इतकी असून ८0 दिवसांचा पावसाचा आराखडा पाहता 5765 Lit/Day इतके पर्जन्य जलसंचयन केले जाते.
सद्य स्थितीत हा प्रकल्प सुरळीत चालू असून बोअरवेलचे पुनर्भरण चालू आहे. एकंदरीत या प्रकल्पाबाबत येथील शिक्षक व ग्रामस्थ समाधानी आहेत. येथील मुख्याध्यापक श्री.सुभाष शिंदे सर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस पाटील श्री.संतोष पडवळ यांनी या कामाबाबत आपला महत्त्वपूर्ण अभिप्राय दिला आहे.

#वसुंधरासंजीवनीमंडळ #vasundharasanjivanimandalthane #NGO #Shahapur #RainWaterHarvesting #पर्जन्यजलसंचयनप्रकल्प #WaterConservation #SaveWaterForFuture

Комментарии

Информация по комментариям в разработке