किल्ले राजगड ...संजीवनी माची.

Описание к видео किल्ले राजगड ...संजीवनी माची.

संजीवनी माची ही गडाच्या पश्चिम दिशेस आहे. पाली दरवाज्याने गडावर गेल्यास संजीवनी माचीकडे जाणारी अरुंद वाट दिसून येते. संजीवनी माचीवर घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीवर पाण्याची मोठी टाकी, विशिष्ट अंतरावर बुरूज आहेत. भुयारी मार्गांनी संजीवनी माचीच्या बाहेरील तटबंदीकडे जाता येते. तोरण्यावरून राजगडावर येण्यासाठी संजीवनी माचीवर आळू दरवाजा हा एकमेव मार्ग आहे. आळू दरवाजा सद्य स्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी शौचकूप आढळतात, तसेच पाण्याची टाकी देखील आढळतात. दुहेरी वक्ररेषांकित नाळयुक्त तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी आणि मारगिरी करण्यासाठी होत असे.

Комментарии

Информация по комментариям в разработке