अदिवासी पाड्यात.

Описание к видео अदिवासी पाड्यात.

अपरिचितांच्या शोधात.
उनाड भटकंती. अदिवासी पाड्यात.
कास‍ा. जि ठाणे.
अदिवासी समाज हा जंगलात राहणारा समाज . जंगलाचा व निर्सगाचा यांचा नेहमीचा सबंध. त्यांचे देवदेवता सुध्दा लाकडावर कोरलेले.
कास‍ा गावाजवळील एका अदिवासी पाड्यात फिरत असताना एकदम नजर गेली ती एका मोठ्या झाडाखाली.गावचा बाजार असल्याने आदिवासी लोकांची ये जा सुरु होती.
ज्या च्या शोधात होतो ते एकदम समोर दिसल ते होत झाडा खाली सावलीत दोन अदिवासी लाकडा मध्ये कोरलेल वीरगळ.
आज पर्यंत आनेक वीरगळ पाहिल्या पण अदिवासी समाजातिल लोकांनी आपल्या गावतील वीरा बद्दल विरगळ लाकडावर कोरुन त्या मृत व्यक्ती बद्दल आपली भावना व्यक्त केली होती.
गावात पारावर चौकशी केली असता समजल की झाडाखाली असलेल्या दोन लाकडी खांब हि लोक ' वीरोबा ' नावाने देव म्हणुन पुजतात , त्याला नेहमी नेवैद्य चढवला जातो. ते दोन देव म्हणजे त्या गावचे वीर आहेत आहेत. त्या लोकांना विरगळ हा शब्दच नविनच. शेवटी वीर,वीरोबा एकच.
मुळात विर मरण पावला की तो शंकराच्या गणलोकात जातो मग मोक्षास प्राप्त होत.
आदिवासी लोकात दगडी स्वरुपात असेल तर तो 'वीरा' नावाने ओळखला जातो.
मुळात भगवान शंकर हे अदिव‍ासी रुपात प्रथम आहेत. अदिवासी समाजाची त्यावर खुप श्रध्दा. आर्य भारतात आल्या नंतर त्यांनी या देवाचा स्विकार केला. शैव व वैष्णव दोन्ही पंथ त्याची पुजा करतात.
येथे असलेले वीर शिवगणाशी संबधित असुन ते पुढे ' वीरोबा' नामक पुजले गेले.
झाडा खाली आसलेले दोन लाकडी विरगळ सा.तिन फुट उंच आहेत.
मध्यभागी पोटात काही कोरले आसुन ते स्पष्ट दिसत नाही.शेंदुर फासला आसुन पुजा केली जाते.
कधीतरी येथे शिवमंदिर होते हे तिथे आसलेल्या तुटलेल्या नंदिच्या आवशेषा मुऴे कळते.त्याच्या बाजुला ह्य दोन वीरांच्या वीरगळ आहेत. शंकराचे गण म्हणुन ते विरोबा झाले.

संतोष चंदने, चिंचवड,पुणे.

Комментарии

Информация по комментариям в разработке