Ellora Caves Kailash Temple हे शिव मंदीर औरंगाबाद जवळ कसं निर्माण झालं?

Описание к видео Ellora Caves Kailash Temple हे शिव मंदीर औरंगाबाद जवळ कसं निर्माण झालं?

#Mahashivratri #Ellora #KailashTemple
औरंगाबादपासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेलं वेरूळचं कैलास मंदिर भारतातील आश्चर्यांपैकी एक आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की एका दगडात कोरलेलं मंदिर आहे, असं मंदिर जगात कुठेही नाही. कैलास पर्वतावरील महादेवाच्या निवासस्थानावरून या मंदिराची रचना केल्याचं सांगण्यात येतं. हे मंदिर बर्फासारखं पांढरं दिसण्यासाठी त्याला पूर्ण पांढरं प्लास्टर करण्यात आलं होतं. काळाच्या ओघात प्लॅस्टर निघून गेलं. पण काही ठिकाणी या प्लास्टरचे अवशेष पाहायला मिळतात. युनेस्कोने 1983 ला या वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला. इ. स. 757 मध्ये राष्ट्रकुट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत हे लेणी कोरण्यात आली. संशोधकांच्या मते या मंदिराच्या निर्मितीसाठी जवळपास दिडशे वर्षांचा काळ लागला.

Report - Rahul Ransubhe
Shoot Edit - Rahul Ransubhe
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке