विसर्जन मिरवणुकीत मज्जाच मज्जा @yhd

Описание к видео विसर्जन मिरवणुकीत मज्जाच मज्जा @yhd

विसर्जन मिरवणुकीत मज्जाच मज्जा @yhd #ganapati

“वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा”

गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू सण नव्हे तर उत्सव म्हणून संपूर्ण भारतभर पण त्यापेक्षा मुंबई आणि कोकणात प्रचंड भक्ती भावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं.गणेशोत्सव हा सण उत्साहाने आणि गुण्या गोविंदाने साजरा होणारा सण आहे. या सणामुळे कितीतरी हातांना रोजगार उपलब्ध होतो. कोटयावधीची उलाढाल होतांना आपल्याला दिसते. संपुर्ण बाजारपेठ उपयोगी वस्तुंनी भरलेली दिसते. मुर्तीकारांची लगबग तर कित्येक महिने अगोदरपासुन सुरू झालेली पहायला मिळते.

गणेश चतुर्थीचा दहा दिवसांचा उत्सव भगवान गणेशाच्या त्यांच्या निवासस्थानापासून पृथ्वीपर्यंतच्या प्रवासाचे प्रतीक आहे, जिथे त्याचे स्वागत खुल्या हातांनी केले जाते.

मा. श्री लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाजाला एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता या उत्सवाची सुरूवात केली होती.

या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ७४ वर्ष पुर्ण झाली.दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही गणेश मूर्ती उंच व्यासपीठावर अतिशय मनोभावे प्रार्थना , मंत्राचे पठण करून जल्लोषात स्थापना केेली गेली.

दर दिवशी लहान मुलांसाठी आणि थोरांसाठी विविध प्रकारचे खेळ, भजन आणि आरत्याचे पारायण केले गेले.

विसर्जनाला जाताना DJ लाऊन धूमधडाक्यात गाव भर गणरायाला फिरवले जाते पण तो क्षण म्हणजे लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं. एका बाजूला सूर्य अस्ताला जात जातो तसे तसे विसर्जन जवळ जवळ येत गेले.

विसर्जनाला जाता जाता पावलं जड झाली होती . . . लहानं बच्चे कंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते.

दहा दिवस जा एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं दरवर्षी होते ते यंदा ही झाले.

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष आसमंतात घुमत १५-२० तरुण आणि जेष्ठ ह्यांनी बाप्पाचे समुद्रात जाऊन विसर्जन केले.

||गणपती बाप्पा मोरया|| ||मंगल मूर्ति मोरया||

हेच काही मी स्वतः अनुभवलेले क्षण तुम्हाला या छोट्या व्हिडिओ मार्फत मांडण्याचे प्रयत्न करीत आहे त्यात तुम्हाला;

१. विसर्जन मिरवणूक
२. विसर्जन मिरवणूक मध्ये डान्स
३. मोठी मुलं समुद्रात जाताना गणपती विसर्जन

विडियो एडिट : योगेश दवणे

धन्यवाद,

#dahanu #koligeet #sea #viralvideo #shortvideo #youtube #india #भारत

विडियो आवडला असेल तर 👍🏻लाइक करा, 🔀शेयर करा आणि सब्सक्राइब करा

मागची व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

   • गोपाळकला ची मज्जा |मध्य मांगेल आळी| ग...  

फेसबुक लिंक:

https://www.facebook.com/yogesh.davan...

Комментарии

Информация по комментариям в разработке