बारामतीकरांनो, दादाला हाकलून लावा.. कोल्हेंनी अजित पवारांना मोक्कार धुतलं! Amol Kolhe Speech Pawar

Описание к видео बारामतीकरांनो, दादाला हाकलून लावा.. कोल्हेंनी अजित पवारांना मोक्कार धुतलं! Amol Kolhe Speech Pawar

बारामतीकरांनो, दादाला हाकलून लावा.. कोल्हेंनी अजित पवारांना मोक्कार धुतलं! Amol Kolhe Speech Pawar

खासदार अमोल कोल्हेंनी बारामतीत जाऊन अजित दादांना बेक्कार धुतलं! परवा अर्धे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्या मतदारसंघात येऊन सांगितलं की, अमोल कोल्हेंनी पक्ष बदलले.. अरे दादा मी पक्ष बदलला, मात्र पक्ष चोरला नाही, चिन्हं चोरलं नाही.. दादा, तुम्ही आम्हाला नकलाकार म्हणता.. पण मला कोणी गद्दार म्हणत नाही.. आता बारामतीचा नवा दादा युगेंद्र असेल.. २३ नोव्हेंबरला ह्या शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना घरी बसवायचं.. बारामतीच्या सांगता सभेत अमोल कोल्हेंची धुवांधार बॅटिंग.. मिमिक्री करत कोल्हेंनी दादाची जिरवली.. नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा.. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसा निवडून येतो तेच बघतो हे आव्हान मोडीत काढत अमोल कोल्हेंनी शिरूरचं मैदान मारलं.या विजयानंतर अजित पवारांवर बोलताना आधी कचारणाऱ्या कोल्हेंनी त्यांच्यावर थेट जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तर अजितदादा -कोल्हेंमध्ये अनेकदा शा‍ब्दिक चकमकी उडाल्या. अजितदादांनी थेट नकलाकार म्हणत त्यांना डिवचलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी बारामतीतील युगेंद्र पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना करारा जवाब दिला.आपल्या राजकीय कारकि‍र्दीत पहिल्यांदाच बारामतीत जाऊन कोल्हेंनी अजितदादांवर घणाघात केला. खासदार अमोल कोल्हेंनी सोमवारी बारामतीच्या सभेत धुवांधार बॅटिंग केली. कोल्हेंनी आपल्या भाषणात अजित पवारांवर जिव्हारी लागणारे घाव घातले. बारामतीत येऊन थेट अजित पवारांनाच टार्गेट केल्यामुळे कोल्हेंनी त्यांच्यावर याआधी करण्यात आलेल्या टीकेचा हिशेब चुकता केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अमोल कोल्हेंनी यावेळी लोकसभेला जर शरद पवारांची लाट असेल तर विधानसभेला त्सुनामी आली असल्याचं म्हटलं. तसेच मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला लोकांनी सांगितलं की मतदानाची तारीख नोव्हेंबर 20,निकालाची तारीख नोव्हेंबर 23 आणि घरी पाठवायचे शिंदे,अजितदादा अन् फडणवीस,असं आपण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे असंही कोल्हेंनी सांगितलं.

Amol Kolhe l Maharashtra Assembly Election 2024 l Ajit Pawar l NCP l Sharad Pawar l Yugendra Pawar l Baramati Vidhansabha l Maharashtra Vidhansabha Election l

#MarathiNews #SatyaMarathi #amolkolhe #ajitpawar #yugendrapawar #maharashtraassemblyelection #maharashtrapolitics #baramati #vidhansabha #ncp #viral

About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.

Комментарии

Информация по комментариям в разработке