Ashta Nayeeka Part - 2 | Shilpa Puntambekar | Savani Datar-Kulkarni | Dr. Madhuri Dongre

Описание к видео Ashta Nayeeka Part - 2 | Shilpa Puntambekar | Savani Datar-Kulkarni | Dr. Madhuri Dongre

नमस्कार, नादमधुरी चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या सर्वांसाठी आम्ही आज एक खास अशी सांगितिक मेजवानी घेऊन आलो आहोत.
माधुरी संगीत विद्यालयाचा ४०वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत.त्या निमित्ताने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम सादर करत आहोत, "अष्टनायिका".
माधुरीताईंच्या बंदीशींवर आधारित ह्या कार्यक्रमातून "अष्टनायिकांच्या" विविध भावावस्थांचे दर्शन घडणार आहे. भाव आणि रागवैविध्य असलेला हा कार्यक्रम आपण सर्व सलग ४ दिवस - ४ भागात ऐकू शकाल.
ज्येष्ठ संगीतज्ञ आणि बंदिश रचनाकार शिल्पा बहुलेकर यांनी माधुरीताईंच्या ह्या बंदीशीचे मनोज्ञ रसग्रहण केले आहे. आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण संहिता प्रसिद्ध लेखिका व कवयित्री किशोरी उपाध्ये यांनी लिहिली आहे.
या अष्टनायिकांच्या भावावस्थांचे दर्शन आपल्या सुरेल गायनातून आपल्यासमोर उलगडणार आहेत सुप्रसिद्ध गायिका भगिनी.. शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार - कुलकर्णी.
------------------------------------------------------------------
शिल्पा पुणतांबेकर यांना गायनाचा वारसा त्यांचे पणजोबा देवगंधर्व पं भास्करबुवा बखले यांचेकडून लाभला. शिल्पा ताईंना गायनाची तालीम त्यांच्या घरातूनच मिळाली. त्यांचे वडील सुधीर दातार, मातोश्री शैला दातार आणि काका सुहास दातार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाचे धडे घेतले. त्यांनी संगीत विषयात एम् ए ही पदवी प्राप्त केली असून शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीत या वर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. भारतात अनेक ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली असून भास्करबुवा बखले यांच्या बंदीशींवर आधारित 'देवगंधर्व' या CD साठी त्यांनी गायन केले आहे. त्याचप्रमाणे श्रीधर फडके यांच्या ऋतू हिरवा, बाबूजींची गाणी अशा सुप्रसिध्द कार्यक्रमातून संपूर्ण भारतात कला प्रस्तुती करत आहेत.
वसंतराव देशपांडे पुरस्कार, सुधीर फडके योवोन्मेष पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------
सावनीताईंना देखील त्यांचे पणजोबा देवगंधर्व पं भास्करबुवा बखले यांचेकडून गायनाचा वारसा लाभला. त्यांना सुधीर दातार, शैला दातार आणि सुहास दातार यांच्या बरोबरच त्यांना ज्योत्स्ना भोळे, पं राम मराठे, माणिक वर्मा इ. अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
सावनीताईनी संगीत विशारद तसेच एम ए संगीत उपाधी प्राप्त केलेली आहे. यांनी देखील भारतभर आपली कला प्रस्तुती केलेली आहे. मंतरलेल्या चैत्राबनात, ऋतू हिरवा इ अनेक कार्यक्रम गाजलेले आहेत.त्याचप्रमाणे त्यांनी संगीत रंगभूमीवर देखील काम केलेले असून Rising star of Marathi Rangbhoomi, वसंतराव देशपांडे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.
--------------------------------------------------------------
डॉ माधुरीताई डोंगरे, पद्मभूषण पं.विनायकबुवा पटवर्धन, डॉ. मधुसूदन पटवर्धन आणि डॉ.सुधा पटवर्धन यांचा शिष्या आहेत. त्यांना पं.बबनराव हळदणकर आणि पं. विकास कशाळकर यांसारख्या गुरूंकडून सुद्द्धा मार्गदर्शन मिळालेलं आहे. मधुरीताईंनी "संगीताचार्य" ही पदवी भारतात प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्यांना,"आदर्श गुरू","संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार" असे ख्यातनाम पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. मधुरीनाईंनी "आनंदी मल्हार" , "नट माधुरी" यांसारख्या नवीन रागांची निर्मिती केलेली आहे.
-------------------------------------------------------------
गायिका : शिल्पा पुणतांबेकर
सावनी दातार - कुलकर्णी
तबला : समीर पुणतांबेकर
संवादिनी : अमेय बिच्चू
निवेदन : मंजिरी जोशी
काव्य : डाॅ. माधुरी डोंगरे
किशोरी उपाध्ये
संहिता : किशोरी उपाध्ये
डाॅ.शिल्पा बहूलेकर
संकल्पना व बंदिश रचनाकार : डाॅ.माधुरी डोंगरे
तानपुरा साथ : वृषाली गोडबोले
मालविका दीक्षित
व्हिडिओ : गायत्री गोखले
स्टूडिओ : काॅस्मिक बिटस्
एडिटिंग : तेजस माजगावकर

Комментарии

Информация по комментариям в разработке