Malamal Tur Lagwad मालामाल तूर लागवड तूर पिकाचे शेंडे कट केल्यामुळे जबरदस्त फुटवे (तूर शेंडे छाटणी)

Описание к видео Malamal Tur Lagwad मालामाल तूर लागवड तूर पिकाचे शेंडे कट केल्यामुळे जबरदस्त फुटवे (तूर शेंडे छाटणी)

शेतकरी मित्रांनो खूप कमी खर्चामध्ये मी तुरीची लागवड केलेली आहे. आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून मी सोयाबीनची टोकन यंत्र द्वारे लागवड केली होती.
तूर आणि सोयाबीन दोन्हींची लागवड टोकन यंत्राद्वारेच केलेली
आहे.
तूर चार फुट अंतरावर एका तासाची लागवड आणि दुसऱ्या तासावर सोयाबीनची लागवड ( म्हणजेच एक तास तुरीचे दुसरे तास सोयाबीनचे )
आणि यामध्ये मी दोन-अडीच फुटाची पास लावून 3 वेळा वखरणी केलेली आहे.
दोन वेळा शेंडे छाटणी केलेली आहे आणि शेंडे छाटणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता.
त्याचबरोबर दोन वेळा ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग केलेली आहे.
तूर 35 ते 40 दिवसाची असताना फक्त एकदाच 10.26.26 खताची पेरणी केली होती .(1 एकर साठी 50k)
( यानंतर फवारणी करून पंधरा दिवसानंतर चा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान फुलदाणी झालेली आहे आणि फुले टिकून राहण्यासाठी औषधाबद्दलची पण माहिती दिली आहे )

या नंतर 15 दिवसांनी तूर पिकामध्ये खूप छान बदल झालेला आहे ते पाहण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा -    • धुक/धुई/धुवारी व ढगाळ वातावरणामुळे तु...  

Комментарии

Информация по комментариям в разработке