श्री

Описание к видео श्री

व्यंकटेश स्त्रोत

ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र.
श्री व्यंकटेश स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात.
त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.
आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला ‘गीर्वाणभाषा’ म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं.
संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. ‘व्यंकटेश स्तोत्र’ हे मराठी अर्थात प्राकृत स्तोत्र असून श्री देविदास यांनी लिहलेला एक सिद्ध ग्रंथ च आहे हा 108 ओव्या चा। आपल्या मानसिक व प्रापंचिक इच्छा याने पूर्ण होतात।
#महाजनगुरुजी #MahajanGuruji यांच्या आवाजातील हे स्तोत्र आपणास नक्कीच आवडेल। मोठ्या अक्षरात लिहलेली प्रत्येक ओवी असल्याने लवकरच आपण ते पाठ ही करू शकता। पुस्तक नसल्यास प्रवासात हे वाचायला खूपच सोपे जाईल। वयोवृद्ध मंडळी ही हे सहज पठण करू शकतात।

श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी लिखित ओवी सह #Shree #Vyankatesh #Stotra In #Marathi #With All #Lyrics

Комментарии

Информация по комментариям в разработке