Womens Day Special | Google Women - Mayuri Kango Exclusive | मयुरी कांगो यांची मुलाखत

Описание к видео Womens Day Special | Google Women - Mayuri Kango Exclusive | मयुरी कांगो यांची मुलाखत

#womensday, #womenspower, #mayurikango

एक मराठी मुलगी अभिनयासारखं ग्लॅमरस क्षेत्र गाजवल्यानंतर, जेव्हा गुगल इंडियाची हेड ऑफ इंडस्ट्री होते...

मुंबई : काही गोष्टी कल्पनेच्या पलिकडे असतात, पण त्या सत्यात उतरतात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात तुमच्या करिअरची सुरुवात केली, म्हणजे शेवटपर्यंत तेच क्षेत्र म्हणजे करिअर असं नसतं, हे एका मुलीने सिद्ध केलं आहे.

तुमच्या करिअर पलीकडेही आणखी एक करिअरची इनिंग तुमची वाट पाहत असतं. पण यासाठी तुमच्याकडे त्याग आणि आत्मविश्वास, सोबत प्रयत्न करण्याची शक्ती असली पाहिजे. हे सांगायचं कारणंही तसंच आहे. ही सुरूवातीला तुम्हाला एक परिकथा वाटेल, ही एक सत्यकथा आहे. ज्यांना ज्यांना करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी ही सत्य कहाणी आहे.

एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी चित्रपट क्षेत्रात करिअर करत होती. ती अभिनेत्री म्हणून नावारुपासही आली. ती एक ग्लॅमरस चेहराही बनली. पण ग्लॅमरच्या दर्पात ती कधी वाहून गेली नाही. चित्रपट क्षेत्रात यश मिळाल्यानंतरही तिने आपल्या शिक्षणाकडे पुन्हा वाट वळवली. त्या आहेत मयुरी कांगो, गुगल इंडियाच्या हेड ऑफ इंडस्ट्री आहेत.


मयुरी कांगो यांची गुगलच्या या अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या पदापर्यंत त्यांच्या पोहोचण्याचा प्रवास जाणून घेतला आहे, झी २४ तासचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी...ही मुलाखत झी २४ तासवर नक्की पाहा...
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Комментарии

Информация по комментариям в разработке