प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan)

Описание к видео प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan)

प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan) आम्ही प्रांजू प्रदनुला घेऊन मामाच्या गावी गेलो होतो. प्रदनु प्रांजुच्या मामाचे गाव साखरी आहे, हे गाव मंडणगड तालुक्यातील आहे. आम्ही मुंबईवरून जेव्हा पण गावी जातो तेव्हा एक दिवस वस्तीला साखरीला जातोच जातो. यावेळेस आमच्या आंबवली वरून साखरी जाण्यासाठी गाडी न मिळाल्यामुळे आम्ही साखरीला चालत गेलो. प्रदनु आणि प्रांजू जाम खुश होते. प्रदनु निसर्गाचा आनंद घेत होता. सासुरवाडीला गेलो की मामी जावयासाठी आणि पोरीसाठी जाम भारी पाहुणचार करतात. कोकणी पद्धतीचा पाहुणचार गावी गेलो की असतो. कधी चिकन तर कधी मच्छी असा मांसाहारी जेवणाचा बेत असतो. वर्षा माहेरी गेली तेव्हा तिची बहीण सुद्धा आली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून रात्रीचे जेवण बनवले. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा सोबत कोंबडी वडे बनवले होते. कोंबडी वड्यांचा बेत जाम भारी झाला होता. रात्री आम्ही सगळेजण एकत्र पंगतीने जेवायला बसलो. गावचं चुलीवरचं जेवण खूपच छान झालं होतं. आम्ही आमच्या गावातील नातेवाईकांकडे गेलो त्यांना भेटुन आलो. साखरी गाव अतिशय सुंदर असं गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव पावसाळ्यात खूपच छान दिसतं. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा आमच्या आंबवली गावी आलो. #MamacheGavSakhari #ChickenSukka #ChickenRassa #sforsatish
तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रदनु प्रांजूचे मामाचे गाव दाखवले आहे. माझ्या सासरोडी जाऊन बायकोने म्हणजे वर्षाने बनवलेले जेवण चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्या लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
https://www.imstagram.com/koknatlamum...

Комментарии

Информация по комментариям в разработке