गौरीचा पहीला ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | Gauri Ganpati Special 2022

Описание к видео गौरीचा पहीला ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | Gauri Ganpati Special 2022

गौरीचा नवीन ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | Gauri Ganpati Special
   • गौरीचा पहीला ओवसा/ववसा आमच्या कडे कसा...  

गौरीचा ओवसा आमच्या कडे कसा भरतात? सुपाचा ओवसा पूर्ण विडिओ | Gauri Ganpati Aovsa
   • गौरीचा ओवसा/ववसा आमच्या कडे कसा भरतात...  

#Gauri #GauriGanpati #parabkitchen #Gauri_Pujan_2021 #गौरीपूजन #gaurai #ovsa #majhigaurai #गौरई #ovsa #gaurichaovsa #gauri #गौरिचा_ववसा ##kokan #gauriagman #gauripujan
#gauriovse #gauriganpati
#gaurai #guhagar #gauri #JyeshthaGauriPuja2022
#marathitradition #ovsepujan #chalgsaye
#gaurichipuja #गौरी #ओवसा #गौरी ओवसा
#कोकण

गौरी आली, सोन्याच्या पावली…
गौरी आली, चांदीच्या पावली…
गौरी आली, गाई वासराच्या पावली…
गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली…

सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात.

● कोकणातील प्रसिद्ध पद्धत वोवसा - ओवसा - औसा

।। "मुळ शब्द शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु
।। त्यात प्रामुख्याने पुढील मतमतांतरे आढळली

● वसा :--- गौरी मातेचा वसा घेणे,
● हौसा :--- गौरीमातेकडुन हौस भागवणे,
● अंशा :--- मातेकडे अंश रुपाने आपल्याकडे प्रकटण्याची विनवणी,

● आय्स :--- आऊस - ( कोकणात आईचे पर्यायी शब्द )
।। वसा = आऊसा, औक्षणचा अपभ्रंश - औशा / औसा,
।। अखंड ओवाळणीचा + वसा, अहो ( अखंड ) + वसा
।। ( वंश ) = अहोवसा ( अखंड वंश पुढे चालत राहण्यासाठी )

।। असो म्हणजे तुमच्या लक्षात आले असेलच की
।। एकुणच सगळा आटापिटा गौरीमातेच्या
।। कृपाछत्रासाठी केला जातो.

।। प्रथम आपण वोवसा - ओवसा - औसा म्हणजे काय
।। ते पाहुया. एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५
।। प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे,
।। करंडा फणी, ओटी ( खण व नारळ ) आणि वानाच्या
।। पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून,
।। अशी ४ सुपे गौरीच्या पुढ्यात वोवसन्यासाठी -
।। ओवसा करण्यासाठी / भरण्यासाठी ठेवतात.

।। आता वोवसणे - ओवसा करणे / भरणे म्हणजे नक्की
।। काय ते पण सांगायला पाहिजे. घरातील सुवासिनी
।। गौरी समोर जाऊन पहिले हळद - कुंकू लावून गौरीची
।। पूजा करायची आणि मग २ हातांनी भरलेले सूप
।। धरून गौरी समोर करून खाली ३ वेळा सूप ओढायचे
।। या प्रकियेला गौरीला वोवसने असे म्हणतात. नवीन
।। लग्न झालेली मुलगी ५ सूप घेऊन पहिली आपल्या
।। माहेरच्या गौरीला वोवसा वोवसून सासरी सूप घेऊन
।। यायचे आणि सासरच्या गौरीला वोवसायचे अशी
।। पद्धत आहे.

।। ज्या वर्षी रवि पूर्वा नक्षत्रावर गौरी आवाहनाचा
।। दिवस असतो त्यावर्षी नवीन जोडप्यांचे वोवसे
।। असतात म्हणजेच सुर्याचा पुर्वा नक्षत्र प्रवेश साधारण
।। एका वर्षाआड गौरी आवाहनावेळी होत असतो तो
।। दिवस ( उदा. ऑगस्ट २०१७ ची गणेश चतुर्थी
।। पाहावी ) वोवसा करुन झाले कि सर्व जोडपी
।। आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून
।। वोवश्यातले पान वाण म्हणून त्यांना देतात आणि
।। सर्व मोठी मंडळी आशीर्वादाच्या स्वरुपात भरगच्च
।। पैसे देतात...

।। अशा प्रकारे गौरी म्हणजेच साक्षात आदिशक्तीचे पुजन
।। करुन तिच्याकडे अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं जातं

🙏।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
।। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏

#aovsa #ओवसा #गौरीचाओवसा #Gauripoojna #GauriGanpati #gauriovsa2021

Комментарии

Информация по комментариям в разработке