लोककवी वामनदादा कर्डक यांचे शेवटचे गीत | vamandada kardak bhim geete | wamandada kardak | vamandada

Описание к видео लोककवी वामनदादा कर्डक यांचे शेवटचे गीत | vamandada kardak bhim geete | wamandada kardak | vamandada

वामन कर्डक
https://mr.wikipedia.org/s/3rgt
Jump to navigationJump to search
वामन कर्डक
जन्म १५ ऑगस्ट, १९२२
देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
मृत्यू १५ मे, २००४ (वय ८१)
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे वामनदादा
नागरिकत्व भारतीय
पेशा कवी (शाहीर)
ख्याती कवी, शाहिर
धर्म बौद्ध धर्म
जोडीदार अनुसया
शांताबाई
अपत्ये मीरा (जगू शकली नाही), दत्तक पुत्र -रवींद्र कर्डक
वडील तबाजी कर्डक
आई सईबाई तबाजी कर्डक
नातेवाईक सदाशिव (थोरला भाऊ), सावित्राबाई (धाकटी बहीण)
वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.[१] कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.

लोकशाहीर वामन कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्य


अनुक्रमणिका
१ प्रारंभिक जीवन
२ मुंबईला प्रयाण
३ आंबेडकरी चळवळीत सहभागी
४ कवी
५ काव्यसंग्रह
६ गद्य
६.१ ध्वनिफिती व चित्रपट गीते
६.२ अन्य गीतरचना
७ पुरस्कार व सन्मान
८ कर्डकांवर लिहिलेली पुस्तके
९ हे सुद्धा पहा
१० संदर्भ आणि नोंदी
११ बाह्य दुवे
प्रारंभिक जीवन
वामन कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ साली नाशिक जिल्ह्यातील ता. सिन्नर मधील देशवंडी या छोट्याशा खेड्यात झाला. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. त्यांच्या घरी १८ एकर शेती होती. धान्य घरात यायचे तरीही हंगाम संपला की आईने डोंगरात जाऊन लाकडे गोळा करून मोळी बांधून ते जळतण सिन्नर बाजारात विकायचे. वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकायचे व हेडीचा धंदा करायचे. सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायची. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी, कधी भाकरीच खावी लागायची.[२]


आंबेडकरी चळवळीत सहभागी
त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे १९४३ साली वामन कर्डक यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिले होते.[२]

कवी
वामन कर्डक यांचे मराठी व हिंदी वाचन बरेच पुढे गेले होते. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणी बागेत तासनतास बसायचे.[२]

असेच १९४३ मध्ये राणी बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांना प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन कर्डक कवी झाले.[२]

त्यानंतर २००४ पर्यंत कर्डकांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले.[२]

काव्यसंग्रह
‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३
‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६
‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७
गद्य
‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६
ध्वनिफिती व चित्रपट गीते
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
भीमज्योत
जय भीम गीते
सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट - सांगत्ये ऐका)
चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट - पंचारती)
अन्य गीतरचना
ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा, तुझ्याकडे बघून हसतोय गं, काही तरी घोटाळा दिसतोय गं (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)
पुरस्कार व सन्मान
वामन कर्डकांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.

दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.
महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार.
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.
महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.
औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).
प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).
मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)
प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.
नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला
परभणी येथे प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला. नंतर या वह्यांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.
साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.
List of equipments we use
Canon EOS 6D Mark II 26.2MP Digital SLR Camera with EF24-105 mm f/4L is II USM Lens
https://amzn.to/3cvABcw
Sony ICD-UX570F Light Weight Voice Recorder, with 20hours Battery Life, 4GB Built-in Memory -Black
https://amzn.to/3kHySDS
Canon M50
https://amzn.to/3cvF9j6
Canon M50 Adaptor
https://amzn.to/33Rocvt
Boya BY-WM8 Pro-K2 UHF Dual-Channel Wireless Microphone System with One Receiver and Two Transmitter
https://amzn.to/30ioPgP

Manfrotto Lightweight Fluid Tripod Video Head with Flat Base (MVH500AH)
https://amzn.to/3mK3Gpg

Tripod we use
https://amzn.to/2EoUwgr

Voice Recorder we use
https://amzn.to/3iWGDFs

Комментарии

Информация по комментариям в разработке