वारूगड किल्ला 😍 वारूळाच्या आकाराचा सुंदर किल्ला 🧗 Varugad fort

Описание к видео वारूगड किल्ला 😍 वारूळाच्या आकाराचा सुंदर किल्ला 🧗 Varugad fort

विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारूगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे.

---------------------------------------------




वारूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे. एक मार्ग दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड असाही आहे. हे दोन्ही अतिशय कच्चे आहेत. वारूगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा आहे. या मार्गावर एस.टी.ची सोयही आहे. अन्यथा गिरवी पर्यंत येऊन तेथून चार कि.मी. चालत वारूगडाचा पायथा गाठता येतो....!



#varugad
#Varugad_Fort
#fort #killa
#marathi_vlog
#shivajimaharaj
#sambhaji_maharaj
#shorts #viral
#viralvideo
#maharashtra
#maharaj
#sahyadri
#phaltan
#safari
#sagar_madane_creation
#sagarmadane

Комментарии

Информация по комментариям в разработке