पितृ पक्ष कधी सुरू होतोय, पाहा पितृ पक्ष तिथी आणि श्राद्धाच्या जेवणाचे नियम
पितृ पक्ष 2023,pirtu paksh 2023,कधी सुरू होतोय पितृ पक्ष?,श्राद्ध पक्षाची तिथी,पिंडदान,pinddan,shraddha 2023,pitru paksh tithi 2023,
#पितृपक्ष2023
#pirtupaksh2023
#कधीसुरूहोतोयपितृपक्ष?
#श्राद्धपक्षाचीतिथी
#पिंडदान
#pinddan
#shraddh2023
#pitrupakshtithi2023
नमस्कार, आपल्या लोकप्रिय "2kcreation" चॅनेल वर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृ पक्ष कधी सुरू होतोय हे जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करुया...
पितृ पक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू होत असून १४ ऑक्टोबरला संपेल. पितृपक्षात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे किंवा परिधान करणे शास्त्रात निषिद्ध आहे. पितरांचे श्राद्ध करताना ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात.
पितृ पक्षाचे महत्त्व आणि नियम जाणून घेऊया. गणपती बाप्पाला निरोप देताच पितृ पक्ष सुरू होईल. म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृ पक्ष सुरू होईल. पौर्णिमा तिथीचे श्राद्ध २९ सप्टेंबरला आणि पितृ अमावस्या १४ ऑक्टोबरला असेल.
म्हणजेच पितृ पक्ष २९ सप्टेंबरला सुरू होईल आणि १४ ऑक्टोबरला संपेल. पितृपक्षात पितरांच्या मृत्यू तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे. ज्यांची मृत्यू तारीख माहित नाही अशा लोकांचे श्राद्ध अमावस्या तिथीला केले जाते.
पितृ पक्षाच्या सर्व तिथी
पितृ पक्षाचा पहिला दिवस: २९ सप्टेंबर, पौर्णिमा श्राद्ध, प्रतिपदा श्राद्ध
पितृ पक्षाचा दुसरा दिवस: ३० सप्टेंबर, द्वितीया श्राद्ध
पितृ पक्षाचा तिसरा दिवस: १ ऑक्टोबर, तृतीया श्राद्ध
पितृ पक्षाचा चौथा दिवस: २ ऑक्टोबर, चतुर्थी श्राद्ध
पितृ पक्षाचा पाचवा दिवस: ३ ऑक्टोबर, पंचमी श्राद्ध
पितृ पक्षाचा सहावा दिवस: ४ ऑक्टोबर, षष्ठी श्राद्ध
पितृ पक्षाचा सातवा दिवस: ५ ऑक्टोबर, सप्तमी श्राद्ध
पितृ पक्षाचा आठवा दिवस: ६ ऑक्टोबर, अष्टमी श्राद्ध
पितृ पक्षाचा नववा दिवस: ७ ऑक्टोबर, नवमी श्राद्ध
पितृ पक्षाचा दहावा दिवस: ८ ऑक्टोबर, दशमी श्राद्ध
पितृ पक्षाचा आकरावा दिवस: ९ ऑक्टोबर, एकादशी श्राद्ध
पितृ पक्षाचा बारावा दिवस: १० ऑक्टोबर, मघा श्राद्ध
पितृ पक्षाचा तेरावा दिवस: ११ ऑक्टोबर, द्वादशी श्राद्ध
पितृ पक्षाचा चौदावा दिवस: १२ ऑक्टोबर, त्रयोदशी श्राद्ध
पितृ पक्षाचा पंधरावा दिवस: १३ ऑक्टोबर, चतुर्दशी श्राद्ध
सर्वपित्री अमावस्या: १४ ऑक्टोबर, शनिवार
पितृ पक्षातील तिथींचे महत्व
पितृ पक्षातील सर्व तिथींना विशेष महत्त्व आहे. उदाहरणार्थ, ज्या पितरांचा मृत्यू होतो त्या तिथीचे श्राद्ध केले जाते. द्वितीया तिथीला ज्या लोकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे श्राद्धही त्याच तिथीला केले जाते. नवमी तिथीला ज्यांचे निधन झाले, त्यांचे श्राद्धही पितृ पक्षातील नवमी तिथीला केले जाईल.
ब्राम्हण भोजनाचे नियम
पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणाला आपल्या घरी आदराने बोलावून त्याला भोजन द्यावे. ब्राह्मणांना जेवण देण्यापूर्वी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अन्न देऊ नका. ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर गाय, कुत्रे, कावळे यांना जेऊ घाला.
श्राद्ध दुपारी सुरू करावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. ब्राह्मणांच्या मदतीने मंत्रोच्चार करून श्राद्ध सुरू करा आणि नंतर पाण्याने तर्पण करा. त्यानंतर पितरांचे ध्यान करून त्यांना अन्नग्रहण करण्याची प्रार्थना करावी.
उपवास सोडताना चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ वर क्लिक करा.
मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर 'Like', 'Share' आणि Comments नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय "2kcreation" चॅनेलला "Subscribe" करा.
धन्यवाद
Информация по комментариям в разработке