Popti | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

Описание к видео Popti | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay

गावाकडची पोपटी 😋
कशी वाटली Video… Comment मद्धे नक्की सांगा 😇

नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇

नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा Special पोपटी 😋

पोपटी म्हणजे काय नक्की? असा प्रश्न अनेकांना पडतो. रायगड जिल्हाच्या संस्कृतीतील खाद्द प्रकार म्हणजे पोपटी. वालाच्या शेंगा या भांबुर्डीच्या पाल्यात एका विशिष्ट मडक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजविण्यात येतात. हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असे म्हटले जाते.

साहित्य

गावठी वालाच्या शेंगा
भांबुर्डीचा पाला
चिरलेला कांदा
बटाटा सालासकट कापून
अंडी
मसाला लावलेले चिकन
ओवा
जाडे मीठ
मातीचे मडके
बनविण्याची पद्धत

मातीचे मडके घ्या. त्यात तळाला भांबुर्डीच्या पाल्याचा थर लावा आणि मग त्यावर शेंगांचा थर लावा
त्यावर अंडी, बटाटे, कांदे आणि पुन्हा शेंगांचा थर लावा आणि मग जाडे मीठ आणि ओवा चवीनुसार पसरवा
पुन्हा त्यावर शेंगांचा थर लावा आणि इतर साहित्यही टाका, सर्व व्यवस्थित थर लागले की मडक्यातील सर्व पदार्थ नीट बसतील असे हलवून घ्या
त्यानंतर वरून भांबुर्डीच्या पाल्याने मडक्याचे तोंड बंद करा आणि तुम्ही चूल पेटवून त्यावर मडके ठेवा. मडके नसल्यास, तुम्ही पत्र्याच्य डब्याचाही वापर करू शकता. मात्र मातीच्या मडक्यात याची चव अधिक चांगली होते. चांगल
ी धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपाट टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मडक्याला सर्व बाजूने धग मिळण्याची गरज आहे
साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे ठेवावे लागते. पोपटी शिजली आहे की नाही हे कळण्यासाठी वरून पाण्याचे दोन – तीन थेंब टाकावे. लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली असे समजण्यात येते
यानंतर मडके उचलून गोणपाटावर उलटे करावे आणि मग सर्व साहित्य काढून पटकन दडपवून घ्यावे
आता गरमागरम पोपटी खाण्यासाठी तयार
रेसिपी चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏼

मसाला ऑर्डर करण्यासाठी लिंक Bio मध्ये दिलेली आहे 🥳

#popti #matka #roastedchicken #gavran #marathi #shetkari #shetkari_raja #bailgada #raja #maharashtra #seafood #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #mimarathi #alibag #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar

video credit:
music: @YouTube @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar

stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️

Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇

Комментарии

Информация по комментариям в разработке