पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर- समग्र सांगीतिक दर्शन- Video

Описание к видео पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर- समग्र सांगीतिक दर्शन- Video

पंडित विष्णू दत्तात्रय पलुस्कर समग्र सांगीतिक दर्शन, त्यांची जीवनयात्रा आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पुनरुज्जीवनाचे महान ऐतिहासिक कार्य सर्व सामान्य आणि जाणकार लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा कार्यक्रम . लो. सेवा संघाच्या नाडकर्णी बालकल्याण केंद्र सभागृह, विले पार्ले (पू. ) येथे जेष्ठ नागरिक 'दिलासा' शखेतर्फे, गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ४ वाजता, सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना, संकलन आणि संहिता वासंती गोखले यांची आहे. लो. सेवा संघाच्या कार्यवाह डॉ. रश्मी फडणवीस यांच्या विशेष परिश्रमपूर्वक मार्गदार्नखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि दिलासाच्या जेष्ठ नागरिकांनी त्याचे सादरीकरण केले. आशा कुलकर्णी आणि मीरा पेंडसे यांनी या कार्यक्रमाला आपल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांनी विशेष उजळा दिला.

दिलासाच्या प्रथितयश गायिका माया कुलकर्णी, विद्या पेठे, प्रतिभा सराफ, हेमांगी राजनेकर, वैशाली जोशी तसेच 'तंबोरा वादन आणि तारण गायन' करणाऱ्या बागेश्री परिख, कीर्तनकार सुलभा प्रभुदेसाई यांनी आपल्या शास्त्रीय गायन पद्धतीने सन १९०० ते १९६० पर्यंतचा पलुस्कर घराण्याचा संपूर्ण सांगीतिक प्रवास आणि ऐतिहासिक कालखंड पुनरुज्जीवित केला. पेटी वादक लता फडके, तबला वादक मंदार शिकरेकर, आपल्या सुंदर साथीने कार्यक्रमात बहार आणली. विशेष सहाय्य श्रीधर फडके यांनी केले. त्याचप्रमाणे व्हिडिओ शूटिंग एक्स्पर्ट सुधाकर रायकर यांनी ह्या कार्यक्रमात 'जान' आणली. महाराष्ट्रातील ह्या थोर संगीत प्रसारक , गायनाचार्य आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे भाग्य या कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ. सुहास पिंगळे आणि प्रसिद्ध समीक्षक राजेंद्र मंत्री यांनी मार्गदर्शनपर चार शब्द सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ह्या थोर संगीत प्रसारक , गायनाचार्य आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे भाग्य लो. सेवा संघाच्या 'दिलासा' या शाखेला लाभले. .

Комментарии

Информация по комментариям в разработке