गझल: दळभद्री स्वप्ने | प्रसाद माधव कुलकर्णी | एक रविवार : एक गझल (भाग-221)

Описание к видео गझल: दळभद्री स्वप्ने | प्रसाद माधव कुलकर्णी | एक रविवार : एक गझल (भाग-221)

"गझल हा प्रकार म्हणजे पक्का लयबध्द अक्षरांचा पिंजराच! ...... गझलचा दोन - दोन ओळींचा आकृतिबंध अतिशय काटेकोरपणे सांभाळायचा आणि शिवाय दुसऱ्या ओळीच्या शेवटी वाचकांकडून मनापासून दाद मिळवायची हे काम सोपे नव्हे….

गझलकार कवी हा एका भन्नाट विचारवादळाने गुरफटलेला असतो. त्याच्या लिखाणात एक वेगळीच धमक असते, एक वेगळाच प्रत्ययकारक अविष्कार असतो.दोन ओळीचा 'शेर'. त्यातल्या आकृतिबंधात नियमां बरोबर एक सजीवता असते - जिवंतपणा असतो. त्यातल्या शब्दांना खरोखरच एक अक्षरत्व लाभलेले असते...

गजलेला तसा कुठलाही विषय परका नाही. प्रेयसी ते परमेश्वर ,शृंगार, सामाजिक-सांस्कृतिक इत्यादी विषय. या गझलांमुळे मराठी साहित्याला एक रगेल बाळसे लाभले आहे, असा मला भास होतो….”

-पंडित यशवंत देव
('गझलसाद' संग्रहाच्या ‘गझलप्रसाद' प्रस्तावनेत)

———

प्रसाद माधव कुलकर्णी
इचलकरंजी
(गझलांकित (२००४), गझलसाद (२०१०), आणि गझलानंद (२०१४) या संग्रहांचे गझलकार)

संपर्क क्र. 98508 30290

#MarathiGazal #EkRavivarEkGazal #PrasadKulkarniGazal

Комментарии

Информация по комментариям в разработке