पोलिस चौकी औराळा ता.कन्नड उदघाटन सोहळा दिनांक 15.08.2020

Описание к видео पोलिस चौकी औराळा ता.कन्नड उदघाटन सोहळा दिनांक 15.08.2020

दिनांक 15/08/2020 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पोलिस ठाणे देवगांव रं अंतर्गत औराळा या ठिकाणी पोलिस चौकीचे उदघाटन मा.श्रीमती मोक्षदा पाटील मँडम पोलिस अधीक्षक औरंगाबाद ग्रामिण, यांच्या हस्ते करणयात आले. सदर कार्यक्रम मा. श्री उदयसिंघ राजपुत साहेब आमदार , कन्नड मतदार संघ,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. औराळा गावाच्या परिसरातील एकुण 15 गावाची मागिल तीन वर्षापासुन पोलिस चौकीची मागणी होती. तसेच एकुण 15 गावातील नागरीकांना तात्काळ पोलिसाची मदत मिळावी या हेतुने सदर पोलिस चौकीचे नियोजन करण्यात येवुन मा. पोलिस अधीक्षक याच्यां हस्ते लोकार्पण करण्यात आले, यावेळी सध्याच्या कोराणा पार्श्वभुमीवर ठराविक मान्यवराच्या उपस्थित सामाजिक अतंर ठेवुन मार्किग करुन माँस्क व सँनिटायझर चा वापर करुन तसेच चौकी परिसर स्वछ व निर्जतुकिरन करुन सदरचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. मा, पोलिस अधीक्षक यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधताना पोळा, गणेशोत्सव, मोहरम सणाच्या अनुषंगाने सुचना दिल्या, ज्यामध्ये मुर्तीची स्थापना एक गाव एक गणपती, या संकल्पना राबविणे, मुर्तीचा स्थापना करताना किंवा विसर्जन करताना कोठेही मिरवणुक निघणार नाही. तसेच महिला, वयोवृध्द यांनी त्याच्या तक्रारी बाबत पुढे येवुन निसंकोच पणे तक्रार करावी असे मार्गदर्शन केले, दरम्यान कानडगांव सटीचे येथिल गरीब परिस्थिती असलेल्या व शाळा सोडलेल्या मुलिस देवगांव रंगारी पोलिस स्टेशन कडुन तिचे 12 वी वर्गात शिवुर या ठिकाणी प्रेवशासाठी मदत करुन मा. पोलिस अधीक्षक मँडम यांच्या हस्ते सदर शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
सदर कार्यक्रमास मा.श्री गणेश गावडे अपर पोलिस अधीक्षक औरंगाबाद ग्रामिण मा.श्री. संदिप गावीत उप विभागीय पोलिस अधीकारी गंगापुर, संजय आहिरे सहा पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे देवगांव रं, औराळा येथिल सरपंच, ग्रामसेवक,व प्रतिष्ठित ग्रामस्थ हजर होते.

Комментарии

Информация по комментариям в разработке