बुद्धिवर्धक पंचामृताचे मोदक - १० मिनिटांत चला करूयात पौष्टिक पंचामृत मोदक | Panchamrut Modak Recipe

Описание к видео बुद्धिवर्धक पंचामृताचे मोदक - १० मिनिटांत चला करूयात पौष्टिक पंचामृत मोदक | Panchamrut Modak Recipe

#पंचामृतमोदक #Modak #PanchamrutModak #GanpatiSpecial #festiverecipes

आज आपण झटपट होणारे आणि पौष्टिक असे 'पंचामृत मोदक' करणार आहोत.
आपण तसं प्रत्येक पूजे साठी पंचामृताचा नैवेद्य करत असतो, पण मग ह्याचेच मोदक केले तर? तेही झटपट आणि आरोग्याला पोषक!
चला मग बघू हे सोपे पंचामृत मोदक कसे बनवायचे ते:

साहित्य:
- दोन वाटी जाड पोहे (भाजून घेतलेले)
- एक मोठा चमचा गूळ (बारीक किसलेला)
- एक वाटी खजूर
- दोन चिमूट वेलची पावडर
- दोन चमचे बदाम पावडर, या व्यतिरिक्त काजूची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आपल्या आवडी प्रमाणे
- पंचामृत साहित्य - दूध (२ चमचे), दही (१ चमचा), मध (२ चमचे), तूप (१ चमचा) आणि पिठी साखर (१ चमचा)

कृती:
- एका वाटी मध्ये वरील प्रमाणात पंचामृत साहित्य एकत्र करून पंचामृत बनवून घ्यावे.
- एक मोठं भांडं घेऊन त्यात भाजलेल्या पोह्यांची पूड आणि १ मोठा चमचा गुळ एकत्र करावे.
- एकत्र करताना त्यात बनवलेल्या पंचामृताचे २ चमचे घालून एकत्र करावे. उरलेले पंचामृत बाजूला ठेवणे.
- त्यात आता वेलची पूड, बदाम पूड व खजूर घालून व सर्व मिश्रण मिक्सर मधून एकत्र करून वाटून घ्यावे.
- हे मिश्रण छान बारीक झाल्यावर त्यात उरलेले पंचामृत, गरजेनुसार १ चमचा किंवा अर्धा चमचा तूप घालून मऊ मिश्रण करून घ्यावे.
- शेवटी बदामाचे काप घालून मोदकाच्या साच्यातून मोदक करून घ्यावे.
तयार आहेत आपले पंचामृताचे बुद्धीवर्धक आणि पौष्टिक मोदक!

ही खिरापत तुमच्या घरच्यांना कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा! आणि अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!

#QuickRecipe #GaneshChaturthi #modakrecipe #ganeshchaturthispecialmodakrecipe
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇
1) ३ पोती तांदळाचे मोदक करणार्‍या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक :-    • ३ पोती तांदळाचे मोदक करणार्‍या सागर क...  

2) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार :-    • गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवड...  

3) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये :-    • युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ ...  

4) गणपती बाप्पा आले, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी केलेला मेनू :-    • कांदा लसूण विरहित मेनू । गणपती बाप्पा...  

5) पंचखाद्याचे तळणीचे मोदक :-    • पंचखाद्याचे तळणीचे मोदक | बाप्पासाठी ...  

6) गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी झटपट गूळखोबऱ्याचे मोदक
:-    • गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी झटपट ...  
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Комментарии

Информация по комментариям в разработке