श्री सद्गुरू कृपा प्राप्त करण्यासाठी हे सद्गुरूपादुकाष्टक म्हणावे | Sadgurupadukashtak

Описание к видео श्री सद्गुरू कृपा प्राप्त करण्यासाठी हे सद्गुरूपादुकाष्टक म्हणावे | Sadgurupadukashtak

श्री सद्गुरू कृपा प्राप्त करण्यासाठी हे सद्गुरूपादुकाष्टक म्हणावे | Sadgurupadukashtak

श्रीगुरुपादुकाष्टक

ज्या संगतीनेंच विराग झाला ।

मनोदरींचा जडभास गेला ।

साक्षात् परात्मा मज भेटविला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥

सद्योगपंथें घरि आणियेलें ।

अंगेच मातें परब्रह्म केलें ।

प्रचंड तो बोधरवि उदेला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥

चराचरीं व्यापकता जयाची ।

अखंड भेटी मजला तयाची ।

परं पदीं संगम पूर्ण झाला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥

जो सर्वदा गुप्त जनांत वागे ।

प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे ।

सद्भक्तिभावांकरितां भुकेला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ४ ॥

अनंत माझे अपराध कोटी ।

नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं ।

प्रबोध करितां श्रम फार झाला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥

कांहीं मला सेवनही न झालें ।

तथापि तेणें मज उद्धरीलें ।

आता तरी अर्पिन प्राण त्याला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥

माझा अहंभाव वसे शरीरीं ।

तथापि तो सद्गुरु अंगिकारीं ।

नाहीं मनीं अल्प विकार ज्याला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ७ ॥

आतां कसा हा उपकार फेडूं ।

हा देह ओवाळुनि दूर सांडूं ।

म्यां एकभावें प्रणिपात केला । 

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ८ ॥

जया वानितां वानितां वेदवाणी ।

म्हणे ' नेति नेतीति ' लाजे दुरुनी ।

नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ९ ॥     

जो साधुचा अंकित जीव झाला ।

त्याचा असे भार निरंजनाला ।

नारायणाचा भ्रम दूर केला ।

विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १० ॥

॥ इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण ॥




#gurupadukashtak
#गुरूपादुकाष्टक

Комментарии

Информация по комментариям в разработке