Raam Prabhu Janma Ghya

Описание к видео Raam Prabhu Janma Ghya

राम प्रभू जन्म घ्या

प्रभु रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीराम चरणी सादर करत आहे...जय श्रीराम ..🙏🏻

आज २२ जानेवारी २०२४, या दिवशी जणू दिवाळी चा उत्साह आणि वातावरण दिसतंय सगळी कडे! अयोध्ये मध्ये राम लल्ला च्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा होणार असल्यानी प्रत्येक भारतीय आनंदित आहे. याच पार्श्वभूमी वर मला आठवतं ते, अगदी लहान असल्यापासून आईकडून ऐकलेलं 'राम प्रभु जन्म घ्या' हे गाणं. कवयित्री उषाताई लिमये यांनी सुमारे ३० ते ३५ वर्षापूर्वी लिहिलेले असावे. उषाताई या राष्ट्र सेवा समितीच्या नागपूर येथील सेविका होत्या, त्यांनी समितीसाठी अनेक गीते लिहिली होती, त्यातील हे एक गीत. याची चाल / संगीत कोणी दिले याबद्दल माहिती नाही मिळू शकली. (कोणाला माहीत असल्यास कृपया कंमेंट्स मध्ये कळवा)

____________________________________________________________________________________________________________

आभार / Credits :

शब्द -
उषाताई लिमये (नागपूर)

स्वर -
स्वरदा गोडबोले

संगीत संयोजन आणि वादन -
प्रशांत भाटे आणि परेश पेठे

रेकॉर्डिंग -
मॅजिक नोट स्टुडिओ
पंचम जोशी

मिक्सिंग आणि मास्टरिंग-
अमोद कुलकर्णी

व्हिडिओ -
केदार गोडसे
____________________________________________________________________________________________________________

शब्द / Lyrics :

या अखंड भारतात राम प्रभू जन्म घ्या|
नीतीचे प्रीतीचे आम्हा वरदान द्या ||

स्वार्थाने भिजलेले मोहातच निजलेले|
सुप्त असे देशप्रेम फिरून जागवून द्या||

त्यागाचे तुम्ही प्रतिक मानवता मूर्त रूप|
दशदिशात भोग हाच रावण मारून द्या||

धर्माध्वज घ्या करात स्कंधी घ्या निज धनुष्य|
तुम्हा सवे राम राज्य भूवरी घेऊन या||

तुम्ही स्वतः पुरुषोत्तम कैवल्यच जे अंतिम|
सूर्यासम विश्वाचा कणकण उजळून द्या||

Комментарии

Информация по комментариям в разработке