Uddhav Thackeray यांना शह देण्यासाठी Congress विधानसभेत कोणत्या जागांवर Sangli Pattern राबवू शकते ?

Описание к видео Uddhav Thackeray यांना शह देण्यासाठी Congress विधानसभेत कोणत्या जागांवर Sangli Pattern राबवू शकते ?

#BolBhidu #UddhavThackeray #MahavikasAghadiSeatSharingFormula

महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकांवर बैठका होतायंत. तिन्ही पक्षांमध्ये काही जागांवर मतभेद असल्यामुळं जागावाटप अजून अंतिम न झाल्याचं सांगितलं जातं. शरद पवारांनीही जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतल्या नेत्यांना केलंय. दस-यापर्यंत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला समोर येईल, असं सांगितलं जातंय. पण ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचंही सांगितलं जातंय. लोकसभा निवडणुकीत मोठं यश आल्यामुळं काँग्रेस विधानसभेसाठी जास्त जागांवर क्लेम करतेय. तर काँग्रेसनं लढवलेल्या काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनंही आपला दावा सांगितल्याचं बोललं जातंय. त्यामुळं लोकसभेला ज्याप्रमाणं सांगली, दक्षिण मध्य अशा जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता, तसाच संघर्ष विधानसभेतही दिसत असल्याचं सांगितलं जातं. पण लोकसभेप्रमाणं ठाकरेंपुढं नमतं न घेण्याची भूमिका काँग्रेसनं घेतल्याची माहिती मिळतेय.

जागावाटपात मित्र पक्ष नको तितका दबाव वाढवत असेल तर लोकसभेतील सांगली पॅटर्नचा इतिहास सांगा, असा सल्ला हायकमांडकडून काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं ठाकरेंना शह देण्यासाठी काँग्रेस विधानसभेला काही जागांवर सांगली पॅटर्न राबवू शकतो, अशा चर्चांना उधाण आलंय. हा सांगली पॅटर्न नेमका आहे काय, विधानसभेला कोणत्या जागांवर काँग्रेस हा पॅटर्न राबवू शकते आणि त्यामुळं ठाकरेंच्या अडचणी कशा वाढू शकतात, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке