शक्तिपात महायोग दीक्षा: माहिती, प्रयोग व अनुभूती - प.पू. योगश्री श्री शरद जोशी महाराज | Mahayog

Описание к видео शक्तिपात महायोग दीक्षा: माहिती, प्रयोग व अनुभूती - प.पू. योगश्री श्री शरद जोशी महाराज | Mahayog

II श्रीगुरु:शरणम् II
आदिनाथ गुरू श्रीमहेश्वरांपासून चालत आलेल्या गुरुपरंपरेच्या मार्गानुसार ज्यावेळी सद्गुरू कृपा करतात, दीक्षा देतात त्यावेळी गुरूच्या शक्तीपाताने शिष्य पापरहीत होऊन दिव्यभावला प्राप्त होतो. शिष्याला अनिर्वचनीय सुखाची अनुभूती येते. या जागृत शक्तीलाच योगी कुंडलिनी म्हणतात तर भक्तिमार्गात तिला आल्हादिनी म्हणतात, वेदांती लोक चितशक्ती म्हणतात.

तात्काळ अनुभूती देणारा, आचरण करावयास सोपा आणि सहज असलेल्या या गीतोक्त महायोगाला माऊली श्रीज्ञानेश्वर महाराज "पंथराज" असे म्हणतात.
वर्तमान काळात प.प.श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराजांकडून योगीराज श्रीगुळवणी महाराजांना लाभलेल्या आणि प. पू श्रीदत्तमहाराज कवीश्वर आणि प. पू श्रीनारायणकाका ढेकणे महाराजांनी वृद्धिंगत केलेल्या शक्तिपात महायोगाची माहिती श्रीवासुदेव निवास, पुणे येथील प्रधान विश्वस्त, शक्तीपाताचार्य योगश्री श्रीशरदभाऊ जोशी महाराज यांच्या प्रासादिक वाणी मधून आपण ऐकूया आणि प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेऊया.

श्री वासुदेव निवास येथे प्रत्येक रविवारी सकाळी ०९:०० - ११:०० या वेळात प्रत्यक्ष मार्गदर्शन व शंका समाधान केले जाते.

४२/ १७, वासुदेवाश्रम पथ, इन्कमटॅक्स लेन
नळ स्टॉप जवळ, कर्वे रोड,
एरंडवणे. पुणे ४११००४
महाराष्ट्र.

दूरध्वनी : ०२० २५४५ ५५८४

Experience Mahayog, Shaktipat yog, Siddhayog or Kundalini Shaktipat yog from mahayog guru and authority - P. Pu Yogshri Shri Sharad Shastri Joshi Maharaj.

P. Pu Yogshri Shri Sharad Shastri Joshi Maharaj is the chief trustee of P.P. Shri Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj and Shri P.P. Shri LoknathTirth Swami Maharaj Smarak Trust at Shri Vasudev Niwas, Erandwane Pune.

Website: https://www.vasudevniwas.org/

#vasudevniwas

Комментарии

Информация по комментариям в разработке