स्वराज्याची पहिली राजधानी | राजगड | संजीवनी माची

Описание к видео स्वराज्याची पहिली राजधानी | राजगड | संजीवनी माची

स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला संजीवनी माचीवरील दुहेरी तटबंदी व त्यावरील शरद अजगर शिल्पांमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे टाकी वाढे बुरुज असलेला हा किल्ला नक्कीच भरण्याजोरा आहे.शिवस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आपल्या मनात शिवकाल जागवतो.संजीवनी माचीची रचना ही आपली मती गुंग करणारी आहे.माचीची तटबंदी जगातील सर्वात सुंदर अशी आहे. शिवरायांच्या दुर्ग बांधणी शास्त्राचा परमाविष्कार म्हणजे राजगडाच्या पश्चिम दिशेस असलेले संजीवनी माची. ही माझी लांबीला तीन सव्वा तीन किलोमीटर आहे हे माची तीन टप्प्यांमध्ये उतरत गेले आहे एका खाली एक अशी टप्पे आहेत प्रत्येक टप्प्याच्या शेवटी एक भक्कम लढाऊ बुरुज बांधला गेला आहे पहिल्या टप्प्यांमध्ये बालेकिल्ल्याच्या पश्चिम कड्याच्या पायथ्याशी या माचीच्या तट सरनोबतच्या सदरेचे आणि किल्ल्याच्या रक्षणार्थ असलेल्या शिबंदीच्या घरांची अवशेष नजरेला पडतात.
तीन तिहेरी बुरुज पहिला टप्पा उतरून तटालगडत थोडे मागे गेल्यावर तीन तेहरी बांधणीचे बुरुज आहे. हे युद्ध शास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत याची बांधणी तिहेरी आहे प्रत्येक टप्प्यांमध्ये जाण्यास पायऱ्या आहेत या तीनही बुर्जांवर तो गड्यांवरील प्रचंड तोफा ठेवलेल्या असाव्यात हे त्या बुरुजाच्या विस्तृत फांजी म्हणजे तटबंदी वरून चालण्याची जागा पाहून आपल्या लक्षात येते. तोफा मारण्यासनी ते वेल्हे मार्गे यांचे रक्षण करीत होत्या तोरण्याच्या झुंजारमाची पर्यंतचा मार्ग ह्या बुरुजाच्या टाळणीमध्ये येतो. राजगडाच्या शिवापट्टण म्हणजेच पाल खुर्द हा राजमार्ग या मार्गावरच आहे.
पहिला झुंजार बुरुज हा माचीच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटी बांधलेला आहे बालेकिल्लाचा पश्चिमेकडील बुरुज ह्या बुरुजाची पाठ राखण करतो हा बुरुज माचीच्या दुसऱ्या टप्प्यातील झुंजार भुजाची पाठरातून करतो दुसऱ्या टप्प्यातील झुंजार बुरुज माचीच्या तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी असणाऱ्या बिनीच्या बुरुजाचे रक्षण करतो. अशी ह्या माचीच्या संरक्षणात्मक प्रतिताराची साखळी व्यवस्था आजोळ आहे. यदा कदाचित संजीवनी माची गणीमाने जिंकली तर ह्या प्रत्येक टप्प्यावर गणी मला कडवा प्रतिकार होईल आणि पद्मावती माचीकडे सरकणे शत्रूस अवघड होईल.
आळू दरवाजा दुसऱ्या झुंजार बुरुजादगड डाव्या हाताला हा दरवाजा लागतो संजीवनी माचीचे हे मुख्य प्रवेशद्वार राजगडावर येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे येथून भूतोंडे ह्या घेऱ्यातील गावात जाता येते याची रचना एखाद्या हुकाप्रमाणे आहे बाहेर जाताना डावीकडून हा दरवाजा झुंजार बुरुजाच्या मारत येतो त्या दरवाज्याच्या अत्यंत चिंचोळ्या जागेमध्ये गनिमाची सहज कुंडी करता येते.
नाळयुक्त चिलखती तटबंदी हे तर किल्ले राजगडाचे भूषण अनेक किल्ल्यास कोट परकोट खंदर आढळतील पण चिलखती तटबंदी हे ठा शिवरायांनी राजगडाला घातलेले आभूषण आळू दरवाजे नंतर माचेच्या तिसऱ्या टप्प्यापासून ही जगातील एकमेव द्वितीय अशी रचना सुरू होते चिलखताच्या दोन्ही तठांमध्ये अंतर अर्धा पाऊण मीटर आहे खोली चार पाच मीटर आहे चिलखता मध्ये उतरण्यास पायऱ्यांचे जिने आहेत तसेच नाळेमधून वर येण्यास दलित सोपान आहेत सोपानात गस्ती करण्यासाठी रात्री मशाल आठवण्यासाठी छिद्र आहेत. संजीवनी माचीचा हा टप्पा उंचीचा विचार करता मूळ डोंगरापेक्षा बराच उतरलेला आहे त्यामुळे गळा शत्रू भिडण्याची शक्यता जास्त होती म्हणून तोफांच्या माऱ्याने किंवा सुरून स्फोटाने दुश्मनाने तटबंदी फाडली किंवा भरदार पाडले तर तिला संरक्षण अशी अंतर्गत तटबंदी बांधली होती. युद्ध समई नाळेतून शिबंदी फिरती ठेवून खूप मोठ्या सैन्याचा आभास मर्यादित सैन्याद्वारे निर्माण करून शत्रूला विस्मय चकित करता येऊ शकते. संजीवनी माचीच्या ह्या बाह्य तळबंदीला एकंदर 12 चिलखती बुरुज आहेत अंतर्गत तटबंदी बुरुज विरहित असून फांजी म्हणजे तटावर रस्तकऱ्यांना फिरण्यासाठी असलेली जागा विस्तृत आहे. जंग्या म्हणजे तटबंदीतील बंदुक्यांसाठी मार गिरीच्या जागा. निरनिराळ्या कोनांमधून राखलेल्या असल्याने वेगवेगळ्या जग्यांमधून संपूर्ण गडाचा चढणीचा मार्ग माऱ्यात येत असे. सर्वात महत्त्वाचे वास्तू वैशिष्ट्य म्हणजे चिल्कता मध्य उतरण्यास असलेले जिने त्यावर ठाले उतरताना डोके आपटू नये म्हणून वेगवेगळ्या उंचीवर प्रमाणे बांधलेले आढळतात वरच्या तटबंदीचे प्रचंड वजन ह्या दगडांनी कसे पेलून धरले याचा शास्त्रीय विचार करता हे जिने बांधताना दगडी चिऱ्यांमध्ये तसेच ह्या जिन्यासाठी वापरलेल्या चुण्यामध्ये काही फरक केला होता का असा विचार मनात येतो.
बिनीचा बुरुज संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्प्याच्या टोकाशी हा बलाढ्य बुरुज आहे. फिरत्या आडव्या चाठावर चरकी ठेवलेली तोफ ३६०° मध्ये मारा करू शकेल इतका हा विस्तृत आहे. त्याला देखील चिलखती तटबंदी आहे मध्ये उतरण्यास दोन्ही बाजूने वाटा आहेत. त्या बुरुजाखालील मूळ खडक उभा तासून काढला आहेत. त्या छिन्नीच्या आजाताच्या खुणा आजही सहज दिसत आहेत. भूगोलाचा विचार करता तोरणा रायगड लिंगाणा या किल्ल्यांपर्यंत या बुरुजाची नजर आहे. दिवसा धूम्रवलय धूर तर रात्री अग्निशिखा म्हणजे अग्नी पेटवून अशा माध्यमातून तोरणा लिंगाणा रायगड या किल्ल्यांवर सांकेतिक संदेश दिले जात होते. सह्याद्रीचे मुख्य रान ह्याच दिशेस असल्याने कोकणातून घाटमाथ्यावर येणाऱ्या वरंधा सुपेनाळ मढे, शेवत्या बोराटा सिंगापूर नाळ, कावल्या बावल्या असे अनेक घाट मार्ग खिंडी नाळी यावर या बुरुजाची पर्यायाने राजगडाची तरडी नजर होती.
राजगडावरील शूर मावळ्यांची नावे खालील प्रमाणे वीर बाजी पासलकर, सुभेदार तानाजी मालुसरे, सरदार नरवीर कान्होजी जेथे, सरनोबत येसाजी कंक, हैबतराव शेळीमकर देशमुख, बाबाजी कोंडे देशमुख, सूर्याची काकडे, पिलाजीराव सणस, बांदल देशमुख, सरदार बाळाजी गव्हाणे,कावजी कोंढाळकर, कान्होजी झुंजारराव, बाबाजी डोहर धुमाळ देशमुख(आढळराव) बाळूजी नाईक ढमाले, सरनोबत धोपटे, सरनोबत पिलाजी गोळे, मानाजी पायगुडे, नागोजी कोकाटे, नावजी बलकवडे.

#rajgad #trekking #nature #hiking #mountains

Комментарии

Информация по комментариям в разработке