संपूर्ण नमन _ श्री ग्रामदेवता लोककला नाट्य मंडळ_दत्त जयंती स्पेशल_

Описание к видео संपूर्ण नमन _ श्री ग्रामदेवता लोककला नाट्य मंडळ_दत्त जयंती स्पेशल_

संपूर्ण नमन _ श्री ग्रामदेवता लोककला नाट्य मंडळ_दत्त जयंती स्पेशल_#kokan #naman #नमन2024 #नमन_गवळण


नमन या लोकनृत्य मध्ये गणगौळण मध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पुजनात गणेशाची आख्यायिका असते. ही सोंगे झाडांच्या लाकडापासून बनवलेली असतात. मात्र आजच्या तारखेला ही सोंगे अनेक प्रकारची हलकी व प्लास्टिक ,फायबर याची बघायला मिळतात. गणपतीच्या आगमनवेळी इतर सोंगेही दाखवली जातात. यामध्ये नटवा असतो.शंखासूर, वाघ, हरण इ. असून या प्रकारात वापरल्या जाणाऱ्या तलवारी लाकडी असतात. गण झाल्यावर “गवळण” प्रकाराला सुरुवात होते. हा भाग खुपच मजेदार व ऐकण्यासारखा असतो. दही, दूध, लोणी घेऊन गवळणी मथूरेच्या बाजाराला जात असतात. त्यांची वाट (रस्ता )गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्ण सवंगडी) वाट अडवतात. nत्यावेळी गोपीका व पेंद्या, सुदाम यांच्यातर्फे अनेक गाणी व वेगवेगळ्या कला सादर होतात. कृष्णाचे संवगडी गवळींची वाट अडवत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लुट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (गवळणी मधील जेष्ठ )अनेक कला सादर करुन नमन रसिकांना हसायला भाग पाडते. गवळणी गाणं म्हणताना या संवगडींना म्हणतात “दहीदुधाचे माठ घेऊनी चाललो मथूरेच्या बाजारी…दह्यादुधाचे नुकसान कान्हा तु का रे करी…!कारण कान्हा रस्त्यामध्ये उभा राहून गवळींची वाट अडवत असतो. त्यावेळी गवळणी त्याला विनंती करतात की, कान्हा सोड आमची वाट,आम्हा जाऊ दे बाजारी…दह्यादुधाने भरल्या घागरी…..! अशा त-हेरे गवळणी नंतर कौटुंबिक जीवनावर आधारीत पण एक चांगला संदेश देणारी छोटीशी नाटीका(फार्स)सादर केली जाते.या नाटीकेचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी असतो.या संपूर्ण नमन खेळात शिपाई हे आदिच्या पोलीस दलातील हवालदार प्रमाणे असतात.गंभीर विषय विनोदी करुन सांगताना त्यातून अनेक संदेश दिले जातात.
#naman #namangan #kokan #konarklive #kokani #naman #marathi #bailgadasharyat #dance #krishna #goodnews #wichitosv #funny #newsmarathi #bailgadasharyat #naadekchfaktbailgadasharyat

Комментарии

Информация по комментариям в разработке