Gold Investment : China पासून ते Russia पर्यंत सगळे सोन्यात गुंतवणूक का करतायत ? जागतिक मंदी येणार ?

Описание к видео Gold Investment : China पासून ते Russia पर्यंत सगळे सोन्यात गुंतवणूक का करतायत ? जागतिक मंदी येणार ?

#BolBhidu #GoldPriceRate #IndianGoldNews

मागील काही आठवडे सोने आणि चांदी यांच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये काल सोने सर्व करांसहित प्रति दहा ग्रॅम ८२४०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेले तर चांदीने १,००,००० रुपये किलोचा टप्पा सहज पार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मागील तीन-चार महिन्यांत आलेली सोन्यातील तेजी ही आजवरच्या इतिहासात सर्वाधिक समजली जात आहे. विश्लेषकांनुसार हि सोन्यातील मोठ्या तेजीची सुरुवात आहे. डॉलरच्या भाषेत बोलायचे तर सोने लवकरच ३,००० डॉलर प्रति औंस (सध्याचा भाव २,७८३ डॉलर) म्हणजेच रुपयात बोलायचे तर सुमारे ९२,००० रुपये ते ९३,००० रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचेल, असे म्हटले जात आहे. तर गुंतवणुकीच्या दृष्टीने चांदी सोन्यापेक्षा कैक जास्त परतावा देण्याची शक्यता असल्याचेदेखील सांगितले जात आहे. अनेकांनी चांदी पुढील वर्षअखेरपर्यंत १,५०,००० रुपये जाऊ शकेल, असे म्हटले असून तीन वर्षात २,००,००० रुपयांचा टप्पादेखील पार पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

हे झालं आपल्यासाठी पण दुसऱ्या बाजूला जगभरातील देशसुद्धा मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी करताना दिसत आहेत. यात आघाडीवर आहे चीन, भारत, तुर्की, पोलंड, रशिया... जगभरातील युद्ध सदृश परिस्थितीमुळे, काही देशांच्या युद्धखोर भूमिकेमुळे, अमेरिकेतील वाढती आर्थिकी अस्थिरता यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अमेरिकेतील निवडणूकानंतर जगभरात आर्थिक मंदी येण्याच्या शक्यतेने मध्यवर्ती बँका सोन्याचा जास्तीस्त जास्त साथ करून ठेवताना दिसत आहेत. हा संपूर्ण विषय समजून घेऊ... सोन्यात वाढलेली गुंतवणूक, चीन मोठ्या प्रमाणात करत असलेली सोने खरेदी याचे परिणाम सर्व संभाव्य शक्यता यावर प्रकाश टाकुत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке