Crispy Bombil Fry | कुरकुरीत बोंबील फ्राय | Malvani Seafood | Maharashtrian Recipes | Being Marathi

Описание к видео Crispy Bombil Fry | कुरकुरीत बोंबील फ्राय | Malvani Seafood | Maharashtrian Recipes | Being Marathi

Follow Us On Further Social Media Handles For Recipe Updates
SUBSCRIBE To Being Marathi For Authentic Recipes : https://rb.gy/ktjrs
Follow Us On Instagram : https://rb.gy/hxa3w
Like Our Facebook Page : https://rb.gy/e0dgv
Join Our Facebook Group : https://shorturl.at/mBKLS
______________________________________________________
१५० वर्षांपूर्वी जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा मुंबईहून कोलकाताला एक ट्रेन मुंबईची खास मासळी घेऊन जायची त्या ट्रेन चे नाव होते बॉम्बे डाक . या मासळीची चव इतकी अप्रतिम होती की ब्रिटिशाना याची भुरळ पडली होती त्या माशाच्या उग्र वासाने कि बॉम्बे डाक मेल आली आहे हे समजायचे पुढे हि मासळी कोलकाता मध्ये इतकी प्रसिद्ध झाली की पुढे यातून येणाऱ्या मासळीलाच या मेलच्या नावानं ओळखलं जाऊ लागले आणि ब्रिटिशांच्या राज्यात बॉम्बे डाक चा अपभ्रंश होऊन त्या मासळीला बॉम्बे डक असे म्हणले जाऊ लागले अर्थात तुमचे आमचे आवडते बोंबील. जगभरात भरपूर मागणी असलेला बोंबील सापडतो तो फक्त मुंबई आणि केरळच्या किनारपट्टीतच बोंबलाच्या चविने तर मुंबईकरांना वेडच लावलंय इतकं की क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ही पूर्णपणे फिदा आहे तो या ओल्या बोंबलावरच चला मग आज बनवूया मुंबईच्या खाद्यपरंपरेतील ऐतिहासिक आणि लोकप्रिय असे तळलेले बोंबील अर्थात बोंबील फ्राय.
बोंबील फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागेल सात ते आठ ओले बोंबील
सात ते आठ लसणाच्या पाकळ्या
तीन ते चार आल्याचे तुकडे
सात ते आठ काळीमिरी
दोन चमचे जिरे
एक चमचा घाटी मसाला
एक चमचा संकेश्वरी मिरचीची पूड
एक चमचा हळद
एका लिंबाचा रस
चवीपुरतं मीठ आणि
तळणीसाठी तेल
प्रथम पाहूया की बोंबील निवडावेत कसे घ्यावे दुसरे महत्त्वाचे तोंड लालसर असावं लालसर तोंड असलेले बोंबील ताजे असतात . आता असेच ताजे बोंबील घेऊ या आणि या बोंबलाच डोकं शेपूट आणि कल्ले चिरून घ्या . चिरलेले हे बोंबील मग वाहत्या पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या यानंतर धुतलेला बोंबलाला मधून चिरून घ्या आणि या पद्धतीने बोंबलाचा मनका काढून घ्या. मणका काढण्याने बोंबील जास्त खरपूस तळला जातो पण तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही मनका नाही काढला तरी चालेल आता धुतलेल्या बोंबलावर सपाट परात ठेवा आणि परातीवर दगडी पाटा किंवा वजन ठेवा . बोंबलात असलेल्या पाणी वेगळे काढण्याची ही एक जुनी आणि पारंपारिक पद्धत आहे . किमान एक तास तरी हे बोंबील पाटाखाली राहू द्या एक तासानंतर हा पाटा काढा आणि पहा बोंबील किती सुके झाले ते .
आता तयार करून घेऊया वाटण त्यासाठी आलं लसूण काळीमिरी आणि जिरं थोडसं पाणी घालून एकत्र वाटून घ्या आणि वरून यात घाटी मसाला हळद आणि मीठ घाला या मसाल्यात बोंबील चांगले घुसळून घ्या
आणि रंगासाठी संकेश्वरी मिरचीची पूड घाला . बोंबील काही वेळ या मसाल्यात मुरू द्या . मसाला मुरलेले बोंबील तांदळाच्या पिठात मग घोळवून घ्या आणि कडकडीत तापलेल्या तेलात हे बोंबील फ्राय करून घ्या हे . ओले बोंबील लोखंडी तव्यात कमी तेलातही खरपूस भाजले जातात . तयार झाले खरपूस खमंग चवदार आणि तोंडाला पाणी आणणारे बोंबील फ्राय पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे बोंबील फ्राय तुम्हीही आवर्जून करून पहा आणि आवडीने खा

When the British ruled India in 150 year back, a train from Mumbai to Kolkata used to make rounds, carrying perticuler type of fish from mumbai . the name of that train was Bombay Dak.
The taste of this fish was so amazing or the British were mesmerised with taste. with the strong smell of fish people of kolkata used to know that the Bombay dak train has arrived.
in the British era , the name Bombay Dak got corrupted and that fish used to be called Bombay Duck which means your favorite Bombil, which is in high demand all over the world, is found only in Mumbai and Kerala coast. The taste of Bombil has made the Mumbaikars crazy so much that the god of cricket, master blaster Sachin Tendulkar, is completely in love with its taste. Let's make Bombil Fry, a historic and popular fried Bombil in Mumbai's food tradition,

SUBSCRIBE To Being Marathi For Authentic Recipes :
https://rb.gy/ktjrs

Quick Recipe of Bombil Fry
Learn To Make Bombil Fry In 5 Minutes

पहा आणि बनवा मच्छी च्या काही चविष्ट आणि भन्नाट रेसिपीस ह्या @beingmarathi च्या Playlist द्वारे: https://rb.gy/mss4k
______________________________________________________

For More Such Recipes

सुक्या बोंबलांचे कालवण | Bombil Kalwan in Marathi |Dried Bombay Duck Curry | Koli Fish Curry Recipe
   • सुक्या बोंबलांचे कालवण | Bombil Kalwa...  

हिरव्या मसाल्यातील स्टीम सुरमई फिश | Steamed Surmai Fish in Turmeric leaves | Maharashtrian Recipe
   • हिरव्या मसाल्यातील स्टीम सुरमई फिश | ...  

चमचमीत आंबट तिखट हॉटेलसारखी कुपा फिश मालवणी कढी / Kupa fish curry malwani / goan hRecipe In Marathi
   • चमचमीत आंबट तिखट हॉटेलसारखी  कुपा फिश...  

Tuna Fish Fry Kupa Recipe In Marathi
   • Tuna Fish Fry Kupa Recipe In Marathi  

#bombilfry #recipeoftheday #marathirecipes #recipeinmarathi #beingmarathi #bombayduckfish

Комментарии

Информация по комментариям в разработке