ज्याची वाजत गाजत मिरवणूक काढून विकला जायचा हाच तो टिकल्या आंबा | Success mango farming

Описание к видео ज्याची वाजत गाजत मिरवणूक काढून विकला जायचा हाच तो टिकल्या आंबा | Success mango farming

श्री.शामकांत सखाहरी ठाणगे प्रगतिशील शेतकरी
श्री अविनाश शामकांत ठाणगे
B.Sc (Agri)
मु पो.तिखोल ता.पारनेर जि.अहमदनगर
मोबाईल नंबर
7798482848
9552585143

#आंबा_लागवड
पारनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध तिखोल चा #टिकल्या_आंबा.
गेल्या पन्नास-साठ वर्षापासुन #पारनेर तालुक्यातील तिखोल हे गाव टिकल्या आंब्यासाठी प्रसिद्धीस आले काही वर्षापूर्वी मूळ टिकल्याचा वृक्ष नामशेष झाला असला तरी तिखोल येथील प्रगतिशील शेतकरी श्यामकांत ठाणगे यांनी टिकल्याच्या मात्रृ वृक्षापासून तयार केलेली रोपे आता मोठी झाले आहेत.

सर्वगुणसंपन्न असा #गावरान देशी वाण म्हणजे टिकल्या आंबा या टिकल्या आंब्याची आमराई ठाणगे यांनी तयार केली लोप पावणाऱ्या खास वानाचे पुन्हा एकदा पुनर्जीवन झाले.

हापूस आंब्याची जशी खवय्यांना ओढ लागलेली असते अगदी तसीच टिकल्या आंब्याची असायची या आंब्याची पूर्वी अहमदनगर मध्ये आगमन झाले की वाजत गाजत मिरवणूक निघायची त्यामुळे ग्राहकांना टिकल्या आंबा मार्केट मध्ये आल्याची माहिती व्हायची असा हा सर्व गुणसंपन्न टिकल्या आंबा.

प्रगतिशील शेतकरी शामकांत ठाणगे यांनी टिकल्या आंब्याचे पुनर्जीवन करून आमराई तयार केली मागील चार वर्षापासून टिकल्या आंब्याला फळे येऊन त्याची विक्री पुन्हा एकदा सुरू झाली. मूळ पिकल्या आंब्याचा आकार,रंग ,चव ,टिकण्याची क्षमता, कोयीचा आकार अत्यंत लहान ,फळे झाडाला लागताना एकाच जागेवर दहा ते पंधरा आंबे लागतात ,परिपक्व झाल्यानंतर या आंब्याची टिकवणक्षमता सुद्धा जास्त आहे.

टिकल्या आंब्याचे पुनर्जीवन झाल्यानंतर ठाणगे यांच्या आंबा बागेस अनेक मान्यवरांनी भेटी देऊन माहिती घेतली आहे प्रत्येक मान्यवरांची हीच अपेक्षा आहे की या वाणाचा प्रसार महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये व्हावा.

पारनेर तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने टिकल्या आंब्याची नर्सरी प्रगतीशील शेतकरी शामकांत ठाणगे यांनी सुरू केली आहे. आता टिकल्या आंब्याची रोपे इतर शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत


बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
https://chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...

YouTube
   / @balirajaspecial  

   / @technicalbaliraja  

Facebook page
  / balirajaspecial  

Instagram
https://www.instagram.com/baliraja_sp...

Twitter
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

Комментарии

Информация по комментариям в разработке