क्लस्टर योजनेचा सर्वे होताना सर्वेची पोचपावती मिळावी दिवा भाजपची मागणी

Описание к видео क्लस्टर योजनेचा सर्वे होताना सर्वेची पोचपावती मिळावी दिवा भाजपची मागणी

दिवा:-दिवेकरांसाठी क्लस्टर योजना संजीवनी ठरेल का? या विषयावर आता तरी जागा हो दिवेकर व दिवा भाजपच्या संयुक्त विद्यमाने रविवार ५/२/२३ रोजी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी श्री समर्थ मित्र मंडळ, सेव्ह दिवा फाऊंडेशन, शिवशक्ती रिक्षा युनियन, आदर्श कोकण सहकारी संस्था, तन्वी फौंडेशन, नवरूप मित्र मंडळ, नागनाथ केबल नेटवर्क, आदर्श मित्र मंडळ, नरेश्मा फौंडेशन, अंकुश मित्र मंडळ इ.सामाजिक संस्थानीदेखील सहकार्य केले.यावेळी कार्यक्रमाची प्रस्थावणा दिवा भाजप शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली. तर आता तरी जागा हो दिवेकर चे संस्थापक श्री विजय भोईर यांनी हे चर्चासत्र आयोजित करण्याचं महत्व लोकांना समजावून ही योजना कशी महत्त्वाची आहे व आपल्या या शिबिराचा उद्देश काय आहे हे लोकांना पटवून दिले. ही योजना चांगली की वाईट हे समजावून सांगण्यासाठी ठाणे मतदाता जागरण अभियानाचे क्लस्टरवर अगदी सखोल अभ्यास केलेले श्री अनिल शाळिग्राम,डॉ.चेतना दीक्षित यांनी अत्यंत विस्तृतपणे माहिती दिली.तसेच नागरिकांना सूचित केले की या योजनेबद्दल सर्वे करायला आलेल्या मंडळींना सहकार्य करा परंतु त्याचबरोबर सर्वे केल्याची पोचपावती मागण्याचा आग्रह धरा.तद्नंतर नागरिकांकडून विविध प्रश्न जाहीरपणे विचारण्यात आले व त्यांना डॉ.चेतना दीक्षित यांनी उत्तरे देऊन लोकांच्या शंका कुशंकाचे निरसन केले.या चर्चासत्रात ठाणे लोकमान्यनगर, कळवा इथून नागरिक आले होते. तसेच यावेळी भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे दिवा भाजपचे ज्येष्ठ नेते गोवर्धन भगत मधुकर भगत ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार ठाणे शहर कार्यकारणी सदस्य अशोक पाटील विजय भोईर ठाणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत दिवा मंडल संघटक सरचिटणीस दिलीप भोईर सरचिटणीस युवराज यादव समीर चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उत्तर भारतीय मोर्चा सरचिटणीस अवधराज राजभर गुजराती सेल अध्यक्ष अशोक सोलंकी डॉक्टर सेल आघाडी विद्यासागर दुबे वार्ड अध्यक्ष नागेश पवार राहुल साहू प्रवीण पाटील मधुकर पाटील रेश्मा पवार सीमा भगत सपना भगत संगीता भोईर मंगल राणे अंकुश मढवी महेंद्र भगत जिलाजित तिवारी अमरनाथ गुप्ता रमेश यादव गणेश गुप्ता वीरेंद्र गुप्ता निलेश भोईर प्रणव भोईर आशिष पाटील सुशील सिंग कृष्णा गुप्ता मिथिलेश दुबे राजेश सिंग शंभू यादव अशोक गुप्ता आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Комментарии

Информация по комментариям в разработке