Jeevanvidya's Guidance to Students - Part 2 | Vidyarthyana Margadarshan | Satguru Shri Wamanrao Pai

Описание к видео Jeevanvidya's Guidance to Students - Part 2 | Vidyarthyana Margadarshan | Satguru Shri Wamanrao Pai

प्रस्तुत भागात सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळा व कॉलेजमध्ये जाण्यामागील आपला हेतू काय असावा, हे सांगितले. खरेतर विद्यार्थी जीवन हे पेरणी करण्याचे वय असते. या दहा वर्षात आपण जो काही अभ्यास करतो त्याप्रमाणेच पुढील आयुष्यात आपल्याला फळ मिळते. सर्वसाधारण समज असा आहे की, शाळा कॉलेजमध्ये जायचे म्हणजे फक्त मजा करायची आणि परीक्षा जवळ आली की अभ्यास करायचा, पास व्हायचे. परंतु फक्त मार्क मिळवण्यासाठी केलेला अभ्यास जीवनासाठी उपयुक्त नसून आपण संपादन केलेले ज्ञान पुढील आयुष्यात उपयुक्त ठरत असते. म्हणून ज्ञान मिळविण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये जावे, हा विचार आपण सर्वांनी मनात पक्का रुजविला पाहिजे॰
अभ्यासासाठी कोणते क्षेत्र निवडायचे, याबद्दल देखील सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी मार्गदर्शन केले आहे. आज विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत; मात्र स्वतःची आवड पाहून त्याप्रमाणे आपले क्षेत्र निवडावे. व त्यासाठी अनेक नामवंतांची, यशस्वी झालेल्या व्यक्तींची चरित्रे वाचण्याचा सल्लाही ते देतात. स्वतःच्या क्षेत्रातील अभ्यास Knowledge Oriented करून आपण जितक्या चांगल्या पद्धतीने करू तितके चांगले फळ आपल्याला पुढील आयुष्यात मिळत असते. म्हणूनच शाळा व कॉलेज या केवळ वास्तू नसून ते ज्ञानाचे मंदिर आहे व या ठिकाणी आपण अभ्यास करताना संपादन करीत असलेले ज्ञान हाच खरा देव आहे. ज्ञानरूपी देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर आपल्याला अभ्यास हा केलाच पाहिजे. म्हणून हा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे आवडीने व प्रेमाने करावा.
अभ्यास नेमका कशा प्रकारे करावा, याबद्दल देखील सद्गुरु श्री. वामनराव पै यांनी प्रस्तुत प्रवचनात मार्गदर्शन केले आहे. योग्य पद्धतीने अभ्यास केल्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपली प्रगती होते व आपण स्वतःचा, समाजाचा, कुटुंबाचा, राष्ट्राचा उत्कर्ष साधू शकतो. परंतु अभ्यास हा लादलेला आहे, असा विचार करून तो करण्याचा कंटाळा केल्यास आपली अधोगती निश्चित आहे.
अभ्यास करताना आपले शरीर देखील निरोगी असणे फार आवश्यक आहे. शरीर निरोगी, सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण दारू, गुटखा, सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. व्यसने केल्यास विद्यार्थी रोगी व अशक्त होतात व पर्यायाने ते राष्ट्राच्या अधोगतीस पात्र ठरतात. आपले शरीर एक दिव्य कॉम्प्युटर असून आपण त्यावर ज्या प्रकारे फीडिंग करू त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट्स मिळत असतात. म्हणून तुम्ही शरीराला उत्तम आहार, विहार, व्यायाम व उत्तम विचारांचे जर फीडिंग केले तर त्याप्रमाणे शरीर रिझल्ट देईल. म्हणूनच अभ्यासाची त्रिसूत्री व शरीराचे महत्त्व जाणून घेऊन अभ्यास केल्यास विद्यार्थी खऱ्या अर्थाने यशस्वी होतील.

**********************

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.

***********************

About Satguru Shri Wamanrao Pai
Satguru Shri Wamanrao Pai was a learned philosopher and the founder of the innovative philosophy – ‘Jeevanvidya’. He was born in Mumbai, India, on October 21, 1923, in a middle-class family. He did his graduation from Mumbai University, Maharashtra, India, in 1944 and majored in Economics. He enjoyed a happy married life. His son and daughter are also happily married and well-settled with their children in India. Satguru was employed in the State Government of Maharashtra, and he retired as a Deputy Secretary, Finance, in the year 1981, after which he could devote more time to his discourses and towards developing Jeevanvidya Philosophy.

At a very young age of around 25 years, Satguru Shri Wamanrao Pai was initiated into spiritualism by his Guru, Shri Nana Maharaj Srigondekar. Satguru Shri Wamanrao Pai attained the highest goal of spiritual sadhana (self-realisation), by his devoted and relentless efforts. He experienced inexplicable bliss and satisfaction, which propelled him to spread the spiritual knowledge and bliss to the masses.

Subscribe our channel at https://www.youtube.com/JeevanvidyaMi...
Like us on Facebook:   / jeevanvidya  
Follow us on:   / jeevanvidya  
Find us on: http://www.jeevanvidya.org

#विद्यार्थ्यांना_मार्गदर्शन_जीवनविद्येचे #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai

Комментарии

Информация по комментариям в разработке