मृगगड किल्ला | Mrugagad Fort | सह्याद्रीतील एक रोमांचकारी अनुभव |

Описание к видео मृगगड किल्ला | Mrugagad Fort | सह्याद्रीतील एक रोमांचकारी अनुभव |

सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक सुंदर पहारेकरी किल्ले पाहायला मिळतात. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मृगगड किल्ला सह्याद्रीची भटकंती करणाऱ्या लोकांचं लक्ष वेधतो. आकाराने हा किल्ला लहान असून किल्ल्याची उंची जवळपास 1750 फूट एवढी आहे. या किल्ल्यावरून बऱ्याच दुसऱ्या किल्ल्यांवर नजर ठेवली जात असे. या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने गडाखालच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता.सभासद बखरीत या किल्ल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तसेच उंबरखिडीत करतलब खान याच्याशी झालेल्या लढाई मध्ये या किल्ल्याचा उपयोग झाला असेल असा तर्क दिला जातो.

मित्रांनो चला तर मग किल्ले मृगगड पाहूया.....

Комментарии

Информация по комментариям в разработке