Kolkata Doctor Case मध्ये RG Kar Medical College च्या Dr. Sandip Ghosh यांच्यावर आरोप का होतायत?

Описание к видео Kolkata Doctor Case मध्ये RG Kar Medical College च्या Dr. Sandip Ghosh यांच्यावर आरोप का होतायत?

#BolBhidu #SandipGhosh #KolkataFemaleDoctorCase

डॉक्टरांचा संप, २४ तास काम बंद आंदोलन, नागरिकांचा मोर्चा, एकत्र येऊन आंदोलन, देभरातल्या कित्येक ठिकाणी हे चित्र सध्या दिसतंय, हे सगळं कशामुळं ? तर कोलकातामध्ये घडलेल्या डॉक्टर महिलेच्या हत्या प्रकरणाबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणून. कोलकात्यामधल्या दुर्घटनेला ९ ते १० दिवस उलटून गेले असले, तरी या प्रकरणात नवनवीन खुलासे अगदी रोज होतायत. सीबीआयकडून आर जी कर हॉस्पिटलशी संबंधित प्रत्येकाची चौकशी करण्यात येतेय. महत्त्वाचं म्हणजे आर जी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचीही सीबीआयकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. या हत्या प्रकरणानंतर सुरुवातीपासूनच संदीप घोष रडारवर आले होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच त्यांची दुसऱ्या कॉलेजमध्ये बदली करण्यात आल्यामुळं ममता बॅनर्जी सरकार घोष यांच्यावर इतकं मेहेरबान का आहे ? असाही प्रश्न विचारण्यात आला.

पण आता संदीप घोष यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भ्रष्टाचारासोबतच त्यांच्यावर माफिया राजचे, महिला डॉक्टर हत्या प्रकरणाला वेगळं स्वरुप देण्याचे, दोन वेळा त्यांच्या बदलीचे आदेश आले असतानाही त्यांची बदली करण्यात न आल्यानं त्यांच्या मागं राजकीय शक्ती असल्याचेही आरोप होत आहेत. पण आर जी कर मेडिकल कॉलेजचे डीन संदीप घोष नक्की आहेत कोण, त्यांचा वादग्रस्त इतिहास काय आणि महिला डॉक्टर हत्या प्रकरणात त्यांच्यावरचे आरोप काय, जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке