Solapur मध्ये NCP च्या चुकीसाठी Congress च्या Satej Patil यांची दिलगिरी, नेमकं काय झालं?

Описание к видео Solapur मध्ये NCP च्या चुकीसाठी Congress च्या Satej Patil यांची दिलगिरी, नेमकं काय झालं?

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी रविवारी सोलापूर इथं प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आणि शिवसेनेचे उदय सामंत, काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रचार सभेच्या बॅनरवर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने शिंदे समर्थक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेली ही सभा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनं गाजली. त्यामुळे काही काळ तणवाचं वातावरण निर्माण झालं होतं. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उन्मेष पाटील यांनी संयोजक म्हणून माफी मागितली. तसंच सतेज पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीमधल्या या धुसफुसीबद्दल प्रतिक्रिया दिली. फडणवीस काय म्हणाले ते या व्हिडिओमध्ये बघा.


---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке