समर्थांची गणेश सवाई |

Описание к видео समर्थांची गणेश सवाई |

सवाया हा एक काव्य प्रकार, जो श्री समर्थ ह्यांनी नव्याने आणला. त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते. तेव्हा श्री समर्थ ह्यांनी सवाया म्हणत लोकांना जागृत केले. आपल्या धर्माची ओळख करून देत सवाया खूप आवेशाने म्हटल्या जात. त्यामुळे लोकांमध्ये धर्माविषयी व देवाविषयी प्रेम निर्माण होत असावे. सवाया म्हणताना पहिली ओळ दोन वेळां म्हणावी लागते. ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते. श्री समर्थ म्हणतात :

वंदिला गजवदन । सुख सुखाचे सदन ।

जेणे जाळिला मदन । त्याचे अंतर धरा । । १। ।

राम राम राम । जन सज्जन विश्राम ।

साधकाचे निजधाम । हित आपुले करा । । २। ।

अखंडित निजध्यास । धरा अंतरी अभ्यास ।

बोले भागवत व्यास । हरिभजने तरा । । ३। ।

धीर उदार सुंदर । कीर्ती जाणतसे हर ।

सोडविले सुरवर । वरदायक खरा । । ४। ।

म्हणावा जयजय राम !


समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.

Комментарии

Информация по комментариям в разработке