"Chingi" Marathi Movie Trailer Staring Milind Gawali , Girija Oak

Описание к видео "Chingi" Marathi Movie Trailer Staring Milind Gawali , Girija Oak

स्त्री भ्रूण हत्या या संवेदनशील विषयावर चिंगी नावाचा चित्रपट
राज इस राणी यांनी आणि त्यांची पत्नी अनिता इसराणी यांनी तो निर्मित केला प्लाझा थेटरला या सिनेमाचा भव्य दिव्य प्रीमियर शो झाला आणि फक्त स्त्रियांसाठी तो ठेवण्यात आला होता, माझी आणि गिरीजा ओक यांची मुख्य भूमिका या चित्रपटात होती आणि माझी भूमिका ही स्त्रीभ्रूण हत्या याच्या विरोधात लढणाऱ्या एका नायकाची होती त्यामुळे, प्रेक्षकांनी अक्षरशा मला डोक्यावर घेतलं होतं, त्या भूमिकेसाठी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला, स्त्रियांच्या बाजूने लढणारा
स्त्रियांविषयी आदर असणारा मुली जगामध्ये का हवे आहेत आणि जग मुलींमुळेच सुंदर आहे असं ठामपणे आपलं मत मांडणारा नायक मला करायला सुद्धा फार आवडला,
आणि त्याचं सगळं श्रेय मी राज इसराणी आणि अनिता इस्रायणींना देईन कारण ज्यावेळेला त्यांनी मराठी सिनेमा करायचं ठरवलं त्याच वेळेला त्यांनी मिलिंद गवळी हा आमचा नायक असेल असं डिकलेर केलं, सांगून टाकलं होतं सगळ्यांनाच.
त्याआधी माझे आणि त्यांचे अनेक वर्षाचे व्यावसायिक आणि पर्सनल संबंध होतेच, casting ची त्यांची अतिशय यशस्वी अशी कंपनी होती, जिथे एक लाखापेक्षा जास्त models registered होते, त्यांच्यामार्फत मी अनेक सिरीयल आणि ॲड फिल्म केल्या होत्या, अनिता इस राणी यांचा अतिशय प्रेमळ स्वभाव आणि लागवी असं व्यक्तिमहत्व आहे, फार आपुलकीने त्या प्रत्येकाला वागवतात, या क्षेत्रामध्ये खूप अशा कमी व्यक्ती आहेत,
चिंगी या चित्रपटासाठी राज इसरानी यांनी अशोक पाटोळे यांच्याबरोबर जवळजवळ सहा महिने आठ महिने स्क्रिप्ट वर काम केलं होतं, त्याआधी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वर आधारित चित्रपटाची कथा सुद्धा निवडली होती, मला ज्या वेळेला त्यांनी विचारलं की या दोन पैकी कुठल्या कथेवर आपण सिनेमा करूया तर मला चिंगी ची कथा जास्त चांगली वाटली, मग त्यांनी तीच कथा निवडली आणि त्यावर सिनेमा सुरू करायचं ठरलं,
मी 1984 मध्ये वक्त से पहिले चित्रपट जावेला करत होतो त्यावेळेला कॅमेरामन होते लतीफ भाई हे लतीफ भाई पुढे सिनेमाचं शूटिंग करत असताना हेलिकॉप्टर च्या ब्लेड मध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे दोन मुलं
या चिंगी चित्रपटामध्ये होते, एक कॅमेरामन होता आणि दुसरा मुख्यसहाय्यक दिग्दर्शक होता,
या चित्रपटाचं कास्टिंग माझ्यासमोर झालं कारण पहिलं कास्टिंग माझं झालं होतं त्यानंतर मुख्य हीरोइन म्हणून कोणाला घ्यायचं असा मोठा प्रश्न पडला होता कारण ती भूमिका फारच कठीण होती आणि अचानक राजसरानींना वाटलं की आपण गिरीजा ओक यांना विचारावा आणि गिरीजा ने त्यावेळेला तारे जमीन पर नावाचा चित्रपट आमिर खान बरोबर केला होता त्यामुळे ती मोठी स्टार होती
ती हा मराठी चित्रपट करेल की नाही हा प्रश्न पडला होता
राजस्थानी मला म्हणाले तुम क्या कहते हो होय पिक्चर करेगी
मी म्हटलं पोहोचणे मे क्या हरज है ! गिरीजा तारे जमीन पर च प्रमोशन करून मुंबईत आली तेव्हा राज सरांनी तिला एअरपोर्टला घ्यायला गेले आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन आले आणि चिंगी ची कथा तिला ऐकवली
क्षणाचाही विलंब न करता गिरिजा हा चित्रपट करायला तयार झाली,
आणि गिरीजा ने त्या चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर अभिनय केला,
चित्रपट छान पद्धतीने पूर्ण झाला आणि प्रदर्शनासाठी तयार झाला
पण मराठी चित्रपटाचे दुर्दैव असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट व्यवस्थित प्रदर्शितच होत नाहीत मराठी चित्रपटांसाठी योग्य ते चित्रपट गृह नाही आहेत लोकांना बघण्यासाठी व्यवस्थित सोयीच्या वेळा दिल्या जात नाहीत,
राज सरांनी हार उत्सुक होते चित्रपट छान पैकी प्रदर्शित करण्यामध्ये, तर वितरकाने त्यांना असं सांगितलं की मराठी चित्रपट हा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चालतो पहिले दोन आठवडे तुम्ही काहीच करू नका फारशी पब्लिसिटी करण्यात आपले पैसे फुकट घालू mouth to mouth Publicity
मी दुसऱ्या आठवड्यानंतर चित्रपट चालायला सुरुवात होईल आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपट चालत नाही म्हणून सगळ्या चित्रपटगृहांमध्ये तो चित्रपट काढून घेण्यात आला, चॅनल सुद्धा चित्रपटाला चांगली किंमत देत नाही, त्यामुळे राज इसरानी यांनी हा चित्रपट कुठल्याही वाहिनीला विकलेला नाही आहे त्यामुळे हा चित्रपट खूप खूप कमी लोकांनी पाहिला आहे
मला असं वाटतं की हा अतिशय छान चित्रपट आहे आणि असंख्य लोकांना तो आवडेल.
कलाकारा सारखच चित्रपट पण आपलं नशीब घेऊन येत असतं असं म्हणतात, माझ्या काही
उत्तम भूमिका आणि चित्रपटां पैकी हा एक चित्रपट जो लोकांपर्यंत पोहोचला नाही
माझ्या अशा प्रकारच्या भूमिका जर लोकांपर्यंत पोहोचल्या असत्या आणि असे माझे चित्रपट चालले असते तर कदाचित अनिरुद्ध देशमुख नावाची जी भूमिका आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मी करतो आहे तशा भूमिका माझ्या वाट्याला कधीच आल्या नसत्या.
खलनायक करायला मला आवडतं पण खलनायक चा मला stamp बसलेला कधीच आवडणार नाही
त्यामुळे चिंगी चित्रपटांमधल्या नायकाची भूमिका माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे लोकांपर्यंत आज जरी ही भूमिका पोहोचली नसली तरी सुद्धा कालांतराने केव्हा ना केव्हा तरी हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल अशी माझी आशा आहे आणि मी खूपच आशावादी माणूस आहे
पण गंमत बघा या चित्रपटांमध्ये इला भाटे हे माझ्या आईची भूमिका करता आहेत आणि इतक्या वर्षानंतर आता आई कुठे काय करते या मालिकेमध्ये ते आशुतोष ची आई म्हणून काम करत आहेत,
चिंगी सारखा चित्रपट लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे
हिंदीमध्ये मिम्मी नावाचा एक चित्रपट आला होता जो लोकांना खूपच आवडला त्याची कथा सुद्धा या चिंगी कथेंसारखीच आहे
ज्या चित्रपटासाठी कृती सीनोन या अभिनेत्रीला अनेक पुरस्कार मिळाले तसेच पुरस्कार चिंगी मध्ये गिरिजा ओक ला मिळणं गरजेचं होतं जे तिचं हुकलं,

Комментарии

Информация по комментариям в разработке