IIT-IIM करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज मिळतात, मग आत्ता त्यांना जॉब का मिळत नाहीत ? खरं काय

Описание к видео IIT-IIM करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज मिळतात, मग आत्ता त्यांना जॉब का मिळत नाहीत ? खरं काय

#BolBhidu #IITBombayPlacement #JobCrisis

आपल्या देशातील बहुसंख्य पालकांचं विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे ते म्हणजे आयआयटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि कमीत कमी एक कोटीचं पॅकेज घ्यायचं. फक्त चार वर्षाची इन्व्हेस्टमेंट मेहनतीची आणि मीटर चालू ते सुद्धा हमखास. प्रत्येक वर्षी पेपरमध्ये ही बातमी असतेच की आयआयटी मधील विद्यार्थ्यांना करोडोंच पॅकेज, एका विद्यार्थ्याकडे कमीत कमी तीन ते चार ऑफर असतात. याच्या जोडीला अजून एक बातमी नुकतीच आली आहे ती म्हणजे मुंबई आयआयटी मधील विद्यार्थ्यांना मार्च उलटून गेला तरी सुद्धा अजून प्लेसमेंट मिळालेलं नाही.

नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, आयआयटी बॉम्बेच्या 2000 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट साठी नाव नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 712 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली नाही. ग्लोबल आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंग यांनी हा डेटा शेअर केला आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये सध्या प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू आहे. अजून २ महिने असले तरी विषय चिंताजनक आहे . थोडक्यात प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीच्या ऑफर मिळाल्या नाहीयेत. आज या संपूर्ण विषयावर प्रकाश टाकुयात आणि IIT मधील करोडोचे पॅकेज यावर माजी विद्यार्थ्यांचे काय मत आहे हे जणूं घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке