दादा पाटील महाविद्यालय कर्जत / व्याख्याते- वसंत हंकारे सर /अपेक्षा आई-वडिलांची / सकारात्मक परिवर्तन

Описание к видео दादा पाटील महाविद्यालय कर्जत / व्याख्याते- वसंत हंकारे सर /अपेक्षा आई-वडिलांची / सकारात्मक परिवर्तन

दादा पाटील महाविद्यालय कर्जत / व्याख्याते- वसंत हंकारे सर /अपेक्षा आई-वडिलांची / सकारात्मक परिवर्तन
शरीर आणि मन मजबूत ठेवा- वसंत हंकारे

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये रघुआबा काळदाते यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. सचिन लाड व आर के ग्रुप चिंचोली काळदात यांच्या वतीने प्रसिद्ध युवा व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी रघुआबा काळदाते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रबोधन करण्याच्या हेतूने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांच्या हाताला काम आणि मेंदूला विचाराचे काम दिले पाहिजे. व्याख्यानातून व प्रबोधनातून व्यक्तिमत्व विकास घडून येतो म्हणून वसंत हंकारे सारख्या प्रबोधनकाराचे व्याख्यानाचे आयोजन होत असल्याचे नमूद केले.

वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितले की, आयुष्याला न्याय द्यायचा असेल तर तू कोण आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. बापाएवढ्या वेदना कोणीच सहन करू शकत नाही. आयुष्याची सुरुवात करताना चारित्र्य महत्त्वाचे आहे, अशाच चारित्र्यवान माणसाची सध्या समाजाला खूप गरज आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य खरे महत्त्वाचे आहे. झाशीची राणी, लक्ष्मीबाई पाटील, जिजाऊ यांचे खरे सौंदर्य कर्मात दडलेले होते. आपण आईबाप विसरत चाललेलो आहोत. असे कोणतेच काम करू नका की ज्यामुळे आपल्या आईबापाची मान खाली शरमेने खाली जाईल. आयुष्यातील आई व वडील ह्या खऱ्या देवता आहेत. संगत आणि पंगत कोणाची आहे याचा विचार करून आयुष्य सार्थकी लावा असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.

या व्याख्यानासाठी महात्मा गांधी विद्यालयचे मुख्याध्यापक चौरे सर, रघुआबा काळदाते व त्यांचे कुटुंबीय, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, सचिन लाड, वायकर सर, खरात सर, भोईटे सर, सपकाळ सर, मोहनतात्या गोडसे, अशोक खेडकर आदि विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, रयत संकुल कर्जतच्या तिन्ही शाखेतील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग तसेच दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, सौ. सो. ना. सोनमाळी कन्यामंदिर या तिन्ही शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बोलत्या प्रतिक्रिया अभिप्राय म्हणून मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले तर वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व श्रोतु वर्गाचे आभार रघुआबा काळदाते यांनी मानले.
#speech #imotional #motivation #motivational #motivationalvideo #marathimotivational #felling #crying #father #fathermotivation #speeches #motivationalspeech #maharashtra #motivationmarathi #comedymotivation #funnymotivation #viral #youtube #trending #marathispeaker #college #collegemotivation #collegegirl #principal #students #studentmotivation

Комментарии

Информация по комментариям в разработке