या मतदारसंघांमध्ये रंगणार Sharad Pawar vs Ajit Dada Pawar अशी हेड टू हेड लढाई | Vishaych Bhari

Описание к видео या मतदारसंघांमध्ये रंगणार Sharad Pawar vs Ajit Dada Pawar अशी हेड टू हेड लढाई | Vishaych Bhari

या मतदारसंघांमध्ये रंगणार Sharad Pawar vs Ajit Dada Pawar अशी हेड टू हेड लढाई | Vishaych Bhari

मागच्या पाच वर्षांचा कालखंड हा स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या राजकारणामधील सर्वाधिक राजकीय उलथापालथींनी भरलेला कालखंड ठरला आहे. यादरम्यान उलथापालथींचे अनेक अध्याय लिहिले गेले. त्यातील एक होता तो म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करत असतानाच जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपदाचं आसन डळमळीत झालं होतं. विधानसभेतील बहुमत गमावल्याची कल्पना आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेवर आलं होतं. या घटनेला एक वर्ष होत नाही तोच महाविकास आघाडीमध्ये आणखी एक स्फोट झाला होता. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्याने पक्षात उभी फूट पडली होती. त्यानंतर अजित पवार यांनी महायुतीसोबत हातमिळवणी केल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय जुगलबंदी सुरू आहे. त्यातील पहिली लढाई लोकसभा निवडणुकीत रंगली होती. तसेच त्या लढाईत शरद पवार यांनी अजित पवार यांना जबर धक्का दिला होता. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेल्या लढतीमध्ये मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिल्याने बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार हे आपल्यासोबतच असल्याचे शरद पवार यांनी दाखवून दिले होते. मात्र लोकसभेतील धक्क्यामधून सावरून अजित पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने सज्ज झाले आहेत. तसेत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील संभाव्य जागावाटपाचा अंदाज घेतल्यास  विधानसभेच्या रणांगणात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात अनेक मतदारसंघांमध्ये थेट लढती रंगण्याची शक्यता आहे. तसेच या लढतींकडे राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचंही लक्ष असेल. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये थेट लढती रंगू शकतात आणि त्यात कुणाचं पारडं जड राहू शकतं, हे आपण आता पाहुयात.  


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You


#sharadpawar
#ajitpawar
#vidhansabhaelection2024
#vishaychbhari
#विषयचभारी

sharad pawar,
ajit pawar,
sharad pawar news,
sharad pawar vs ajit pawar,
ajit pawar news,
ajit pawar maharashtra,
ajit pawar ncp,
ajit pawar latest,
ajit pawar vs sharad pawar,
ajit pawar vs yugendra pawar,
yugendra pawar vs ajit pawar,
sharad pawar group,
sharad pawar marathi news,
sharad pawar ncp chief,
sharad pawar news today,
sharad pawar latest news,
ajit pawar party candidate,

Комментарии

Информация по комментариям в разработке